नवी मुंबईत रेल्वे गार्ड कडून प्रवाशी विद्यार्थिनीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 21:19 IST2018-03-28T21:19:56+5:302018-03-28T21:19:56+5:30
रेल्वे गार्ड कडून प्रवाशी विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घनसोली रेल्वेस्थानकात घडली.

नवी मुंबईत रेल्वे गार्ड कडून प्रवाशी विद्यार्थिनीचा विनयभंग
नवी मुंबई - रेल्वे गार्ड कडून प्रवाशी विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घनसोली रेल्वेस्थानकात घडली. रेल्वेतून उतरून तरुणी फलाटावरुन जात होती. यावेळी मोटरमन केबिनच्या मागच्या डब्यात बसलेल्या रेल्वे गार्डने स्वतचे गुप्तांग दाखवून तिचा विनयभंग केला.
विद्यार्थिनी घनसोलीची राहणारी असून पनवेल मध्ये कॉलेजला जाते. बुधवारी दुपारी ठाणे ट्रेन ने घनसोलीला येत असताना हा प्रकार घडला. ए. के. सिन्हा असे रेल्वे गार्ड चे नाव आहे. त्याच्या विरोधात वाशी रेल्वे पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटने नंतर तो फरार असून रेल्वे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.