कोपरखैरणेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: April 6, 2017 02:34 IST2017-04-06T02:34:39+5:302017-04-06T02:34:39+5:30
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी दोघांना अटक केली

कोपरखैरणेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नवी मुंबई : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तलावालगत खेळत असलेल्या १२ वर्षीय मुलीला फूस लावून त्यांनी घरी नेवून तिचा विनयभंग केला होता. यासंबंधीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
कोपरखैरणे सेक्टर १९ येथील तलावालगत हा प्रकार घडला आहे. परिसरात राहणारी १२ वर्षीय मुलगी तलावालगत खेळत होती. या वेळी ती खेळण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरली होती. हा प्रकार त्या ठिकाणी उभे असलेल्या दोघा तरुणांनी पाहिला. सदर मुलगी एकटी असल्याचे हेरून त्यांनी तिला पाण्यात न खेळण्यास सांगितले. तसेच तिला पाण्याबाहेर बोलावून घरी सोडतो, असे सांगून स्वत:च्या घरी नेले. त्या ठिकाणी दोघांनी तिचा विनयभंग केला असता, मुलीने त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर तिने घडलेल्या प्रकाराची माहिती आईला दिली असता, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. यानुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. प्रवीण रामराजे (३३) व रूपेश पालव (३३) अशी त्यांची नावे आहेत. प्रवीण हा कोपरखैरणे गावात राहणारा असून त्याचा मित्र रूपेश हा नेरुळचा आहे. त्यांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून प्रवीणच्या घरी नेले होते. (प्रतिनिधी)
या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी केली दोघांना अटक