शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

Raj Thackeray: महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय ते सर्व आपले पूर्वज - राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:51 IST

marathi bhasha din: आज २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. 

नवी मुंबई : आज २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आई वडिलांकडील नातेवाईक हेच केवळ आपले पूर्वज नसून महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे, जे झटले आहेत ते आपले पूर्वज असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजभाषा महोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवरून लक्ष वेधले.  दरम्यान, महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्रासाठी झटलेल्या लोकांचे योगदान समजून घेणे गरजेचे आहे. तसेच आपण कवी कुसुमाग्रज, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरूषांचे कार्य नीट समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी महाराज समजून घेण्याआधी राजमाता जिजाऊंचे संस्कार वाचा तेव्हाच शिवाजी महाराज कळतील. कारण आताच्या पिढीला वाचणाची नितांत आवश्यकता असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.  

दादा कोंडकेंचे 'एकटा जीव' आवडीचे पुस्तकपनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही मुलाखत घेण्यात आली. यावेळी ठाकरे यांनी त्यांच्या आवडीचे पुस्तक देखील सांगितले. "खरंतर बरीच पुस्तके खूप जवळची आहेत. पण दादा कोंडके यांच्यावरचे 'एकटा जीव' हे पुस्तक खूप छान आहे. ते कुठूनही वाचता येते. कुठूनही तुम्ही ते वाचायला सुरुवात केली की त्यात रमून जाता", असे राज ठाकरे म्हणाले. 

फिक्शन, लव्हस्टोरी वाचत नाहीफिक्शन आणि लव्हस्टोरी अशी पुस्तके मी काही वाचत नाही. दुसरा प्रेम करतोय ते आपण काय वाचायचे. त्याचे तो बघेल ना, असे म्हणत राज ठाकरे यांनी फिक्शन, लव्हस्टोरी वाचण्यात अजिबात रस नसल्याचे म्हटले. पूर्वीचे लेखक समाज कसा शहाणा होईल यासाठी लिहायचे, पण आताचे लेखक आपण किती शहाणे आहोत ते दाखवण्यसाठी लिहितात, असेही राज ठाकरे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिनNavi Mumbaiनवी मुंबई