अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:18 IST2017-08-19T03:18:53+5:302017-08-19T03:18:55+5:30

कोपरखैरणे येथे एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

A minor problem with a minor girl | अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

नवी मुंबई : कोपरखैरणे येथे एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटनांमध्ये आरोपी एकच असल्याचे सीसीटीव्हीवरून स्पष्ट झाले आहे.
कोपरखैरणे येथे राहणाºया पंधरा वर्षीय मुलीवर अज्ञात तरुणाने अतिप्रसंग करुन पळ काढला आहे. पीडित मुलीच्या वडिलांचा व्यवसाय असून ती दुपारी वडिलांसाठी जेवण घेवून गेली होती. यादरम्यान सदर तरुणाने तिचा पाठलाग केला. मुलीला घरी आली असता वडिलांनी पुन्हा बोलावल्याचे सांगून सोबत घेऊन गेला. त्यानंतर जवळच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेऊन मुलीवर अतिप्रसंग करुन पळ काढला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, तो तरुण दिसून आला. यानुसार त्याच्याविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत असतानाच पंधरा दिवसांपूर्वी त्यानेच एपीएमसी आवारात देखील एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचे कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत कांबळे यांनी सांगितले.
दोन महिन्यांपूर्वी खारघर, सीबीडी यासह मुंबईतील अल्पवयीन मुली अशाच घटनेला बळी पडल्या होत्या. अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर अतिप्रसंग केले जात होते. मात्र तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसतानाच दुसरा तरुण समोर आला आहे. त्यामुळे शहरातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेची चिंता पालकांना सतावत आहे. अशा विकृत व्यक्तींवर सक्त कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: A minor problem with a minor girl