कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 02:18 PM2024-03-04T14:18:21+5:302024-03-04T14:18:48+5:30

मुर्डेश्वर -सेनापुरा विभागामधील मालमत्तेच्या देखभाल- दुरुस्तीसाठी दुपारी १२ ते ३ या वेळेत तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू - मुर्डेश्वर एक्स्प्रेसचा ३ मार्च रोजी सुरू होणारा प्रवास कुंदापूर स्थानकावर काही वेळासाठी थांबविण्यात येईल, तर  कुंदापुरा-मुर्डेश्वर विभागादरम्यान रद्द होईल.

Megablock on Konkan Railway Line on Thursday | कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी मेगाब्लॉक

नवी मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर-सेनापुरा  विभागादरम्यान गुरुवार, ७ मार्च रोजी कोकण रेल्वेने तीन तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे या विभागातून धावणाऱ्या एका नियमित गाडीच्या वेळापत्रकात अंशत: बदल केला आहे. त्याचप्रमाणे  इन्नांजे-नंदीकुर विभागादरम्यान दुपारी १२:१५ ते २:१५ वाजेदरम्यान दोन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या विभागातून धावणाऱ्या दोन गाड्या रद्द केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.

मुर्डेश्वर -सेनापुरा विभागामधील मालमत्तेच्या देखभाल- दुरुस्तीसाठी दुपारी १२ ते ३ या वेळेत तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू - मुर्डेश्वर एक्स्प्रेसचा ३ मार्च रोजी सुरू होणारा प्रवास कुंदापूर स्थानकावर काही वेळासाठी थांबविण्यात येईल, तर  कुंदापुरा-मुर्डेश्वर विभागादरम्यान रद्द होईल. त्याचप्रमाणे मुर्डेश्वर-सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल  बंगळुरू एक्स्प्रेसचा ७ मार्च रोजी कुंदापुरा स्थानकातून नियोजित वेळेत सुटेल; मुर्डेश्वर-कुंदापुरा विभागादरम्यान रद्द हाेईल. कोचुवेली-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस मंगळुरू जंक्शनवर ६० मिनिटांसाठी थांबविण्यात येईल.
 

Web Title: Megablock on Konkan Railway Line on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.