शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

माथाडी कामगारांचा बनियान मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:30 AM

माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी वाशीत बनियान मोर्चा काढण्यात आला.

नवी मुंबई : माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी वाशीत बनियान मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये राज्याच्या विविध भागांतील माथाडी तसेच वारणार कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या वेळी माथाडी सल्लागार समितीवर कामगारांच्याही प्रतिनिधीला घेण्याची मागणी करत शर्ट काढून आंदोलन केले.माथाडी कायदा व कामगार चळवळ मोडीत काढण्याचा सुरू असलेला प्रयत्न व माथाडी कामगारांच्या विरोधात होत असलेल्या कृतीविरोधात बुधवारी वाशीत आंदोलन करण्यात आले. महाराष्टÑ माथाडी संघटना कृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.माथाडी नेते तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन झाले. या आंदोलनास नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, लातूर तसेच राज्याच्या विविध भागांतून माथाडी, वारणार, मापाडी तसेच सुरक्षारक्षक कामगारांनी उपस्थिती दर्शवली होती. या वेळी राज्याचे कामगार मंत्री, कामगार विभागाचे प्रधान सचिव व पणन विभागाचा निषेध करण्यात आला. त्याकरिता कामगारांनी शर्ट व बनियान काढून माथाडी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध केला.याप्रसंगी माथाडी नेते गुलाबराव जगताप, चंद्रकांत शेवाळे, बळवंतराव पवार, पोपटराव पाटील, सतीशराव जाधव आदी उपस्थित होते. महाराष्टÑ माथाडी संघटना कृती समितीतर्फे दोन वर्षांपासून कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने आंदोलने होत आहेत. परंतु सरकारकडून माथाडी कामगारांना न्याय देण्यात उदासीनता दाखवली जात असल्याचीही खंत व्यक्त करण्यात आली.या वेळी दोन तास ठिय्या मांडून मूक आंदोलन केल्यानंतर मागण्यांचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. परंतु माथाडी कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत यापुढेही अशा प्रकारची तीव्र आंदोलने केली जाणार असल्याचे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई