खारघरमध्ये मराठी फाउंडेशन तर्फे गुढीपाडव्याला शोभायात्रा

By Admin | Updated: March 26, 2017 05:23 IST2017-03-26T05:23:21+5:302017-03-26T05:23:21+5:30

मराठी फाउंडेशन खारघरतर्फे गुढीपाडव्याला सकाळी ७ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या

Marathi Foundation has organized the festival in Kharghar by Gudi Padwal | खारघरमध्ये मराठी फाउंडेशन तर्फे गुढीपाडव्याला शोभायात्रा

खारघरमध्ये मराठी फाउंडेशन तर्फे गुढीपाडव्याला शोभायात्रा

पनवेल : मराठी फाउंडेशन खारघरतर्फे गुढीपाडव्याला सकाळी ७ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत सर्वांनी पांरपरिक वेशभूषेत सामील व्हावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश राणे यांनी केले आहे.
मराठी फाउंडेशन खारघर तीन वर्षे खारघरमध्ये मराठी अस्मिता जगवण्याचे कार्य करीत असून, खारघर सारख्या कास्मोपोलिटिन भागात मराठी परंपरा जपण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार, २८ मार्च रोजी गुढीपाडव्याला सकाळी ७ वाजता हाईड पार्क, सेक्टर ३५ (आय)मध्ये गुढीची वंदना करून शोभायात्रेला सुरुवात होईल. यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सामील होतील. शोभायात्रेत ५० ढोल, १२ ताशे, झांज व लेझिम पथक सामील होणार आहे.
या शोभायात्रेत सर्वांनी सामील होऊन शोभा वाढवावी, असे आवाहन मंगेश राणे यांनी केले आहे. या वेळी मंडळाचे नवीन सदस्यत्व देण्यात येणार आहे. सदस्यत्व सर्व धर्मासाठी खुले आहे.

Web Title: Marathi Foundation has organized the festival in Kharghar by Gudi Padwal