शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आंदोलकाने रेडा घेऊन गाठली मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:01 IST

मुंबईत मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एक व्यक्ती चक्क स्वतःचा रेडा घेऊन आला आहे. नवी मुंबईत मराठा समर्थक थांबलेला असून, परवानगी मिळाल्यास रेडा घेऊन मुंबईत जाणार आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईMaratha Reservation News: मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीवरून एका शेतकरी रेडा घेऊन आला आहे. सादिक तांबोळी असे रेडा घेऊन नवी मुंबईत दाखल झालेल्या आंदोलक समर्थकांचे नाव आहे. 'हा लढा गोरगरीब शेतकऱ्यांचा आहे. यास पाळीव पशू पक्षांचाही पाठिंबा दर्शविण्यासाठी रेडा घेऊन आलो', असे सादीक यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मागच्या वेळी नवी मुंबईतील वाशीतून परलेल्या मनोज जरांगेंनी यावेळी मुंबईत धडक दिली. मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले. २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लोक येत आहेत. त्यामुळे मुंबईत सगळीकडे गर्दी झाली आहे. मराठा आरक्षण समर्थकांचे जत्थेच्या जत्थे मुंबई, नवी मुंबईत येऊन धडकत आहेत. सादिक तांबोळीही जरांगेंच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी बार्शीवरून आले आहेत. 

नवी मुंबईत रेडा घेऊन थांबले

नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्राजवळ थांबलेला रेडा आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सादिक तांबोळी यांनी सांगितले की, 'मनोज जरांगे पाटील तळमळीने व प्रामाणिकपणे संघर्ष करत आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलो आहे. परवानगी घेऊन आझाद मैदानावर ही जायचे आहे', असे ते म्हणाले. 

'आरक्षणाला विरोध करणाऱ्यांबद्दल सादिक यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'विरोध नको पाठिंबा द्या. गोरगरिबांना आरक्षणाचा लाभ होऊ द्या. शेतकऱ्यांचा लढा आहे. शेतीला सहाय्य करणाऱ्या पशूपक्षांचाही लढ्यास पाठिंबा असल्याचे दाखवण्यासाठी हा रेडा घेऊन आलो आहे', असे तांबोळी म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाSocial Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओ