शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

एकाच दगडात मारले अनेक पक्षी, गणेश नाईक यांची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 05:17 IST

गणेश नाईक यांची खेळी : हुसेन यांचा मार्ग मोकळा, मेंडोन्सा, जैन चर्चेलाही पूर्णविराम

मीरा रोड : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याचे जाहीर करून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी काँग्रेसचे माजी आ. मुझफ्फर हुसेन यांचा मार्ग मोकळा करत, आनंद परांजपे यांच्या प्रचाराची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर टाकली आहे. दुसरीकडे, कट्टर विरोधक माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या परतीच्या चर्चेची वाट बंद करत, भाजपाच्या माजी महापौर गीता जैन राष्ट्रवादीतून लढणार असल्याच्या चर्चेलाही पूर्णविराम देऊन नाईकांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी नव्याने अस्तित्वात आलेला मीरा-भार्इंदर मतदारसंघ मिळावा, म्हणून हुसेन यांनी जोरदार प्रयत्न केले होते; पण मेंडोन्सा यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला खेचून भाजपाच्या नरेंद्र मेहतांचा पराभव केला. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला; पण मोदीलाटेत मेंडोन्सांना पराभूत करून मेहता ९० हजार मते घेऊन आमदार झाले. काँग्रेसचे उमेदवार याकूब कुरेशी यांना २० हजार मतेसुद्धा मिळवता आली नव्हती. आॅगस्ट २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीआधी स्वत: मेंडोन्सांसह राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पक्ष सोडून भाजपा, शिवसेना व काँग्रेसमध्ये गेले. शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्वच उरले नाही. या अहंपणात पालिका निवडणुकीत काँगे्रसने राष्ट्रवादीचा आघाडीचा प्रस्ताव झिडकारून टाकला. याशिवाय, राष्ट्रवादीचे उमेदवारही पळवले. दरम्यानच्या काळात भाजपाच्या माजी महापौर जैन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत त्या मेहतांना पर्याय म्हणून उभ्या ठाकल्या आहेत.विधानसभा निवडणुकीत पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांचे कापले दोरच्लोकसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदर शहरामध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसला सोबत घेण्यशिवाय कोणताच पर्याय नाही. त्यातच गणेश नाईक कुटुंबीय व मेंडोन्सा यांच्यातील वाद नवीन नाही.च्त्यामुळे मेंडोन्सा विधानसभेसाठी परत राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, आघाडीच्या पत्रकार परिषदेत नाईक यांनी मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला दिल्याचे जाहीर करून टाकले. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्यांना पक्षात घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.च्नाईक यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षात उमेदवारीसाठी येऊ इच्छिणाऱ्यांचे दोर कापून टाकत आपले राजकीय हिशेब चुकते केल्याचे सूत्रांनी सांगितले. हुसेन यांना आघाडीची धुरा सोपवतानाच लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची मोर्चेबांधणी चालवली असल्याचे यावरून स्पष्ट होते.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNavi Mumbaiनवी मुंबई