राज ठाकरेंच्या पनवेल मधील मेळाव्यानंतर मनसैनिक आंदोलन
By वैभव गायकर | Updated: August 18, 2023 14:24 IST2023-08-18T14:23:53+5:302023-08-18T14:24:03+5:30
यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होते.

राज ठाकरेंच्या पनवेल मधील मेळाव्यानंतर मनसैनिक आंदोलन
पनवेल : राज ठाकरेंच्यापनवेल मधील मेळाव्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी पनवेल मधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील कार्यालयावर मनसेने मोर्चा काढत.कार्यालय निवेदन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होते.
डीपॉईंट येथील कार्यालयावर मनसैनिकांनी धाड टाकली.यावेळी शेकडो मनसैनिक उपस्थित होते.मात्र अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.यावेळी पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले, जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर आणि जिल्हा सचिव केसरी पाटील,किरण गुरव यांना अटक केली.निवेदन देण्यासाठी देखील पोलिसांनी मनसैनिकांना मज्जाव केल्याने मनसैनिक आक्रमक झाले होते.