'शब्द खरा करुन दाखवला, छगन भुजबळांचा कार्यक्रम संपला'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

By मुकेश चव्हाण | Published: January 27, 2024 09:13 AM2024-01-27T09:13:05+5:302024-01-27T09:16:14+5:30

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन मनोज जरांगे उपोषण सोडणार आहे. 

Manoj Jarange Patil said that this is the victory of the Marathas, not mine. | 'शब्द खरा करुन दाखवला, छगन भुजबळांचा कार्यक्रम संपला'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

'शब्द खरा करुन दाखवला, छगन भुजबळांचा कार्यक्रम संपला'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन मनोज जरांगे उपोषण सोडणार आहे. 

मनोज जरांगे यांनी आज सकाळी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा मराठ्यांचा विजय आहे, माझा नाही. खूपजण म्हणत होते, होणार नाही, शक्य नाही. मुंबईत जाऊन काहीही होणार नाही. हे पोरगं दुसऱ्यांच्या मुलाला फसवायला लागलं आहे, असा आरोप करण्यात येत होते. मात्र मी शब्द खरा करुन दाखवला. आरक्षण खेचून आणलं. मराठा समाजाने खूप संघर्ष केला. आज त्याचा विजय झाला, असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितले. 

छगन भुजबळ यांना काय सांगणार?, असा सवाल विचारल्यावर, त्यांना काय सांगणार, त्यांचा कार्यक्रमच संपला आहे. तसेच पुन्हा काही अडचणी आल्यास हा पठ्ठ्या लढणार. पुन्हा उपोषण करेन, पुन्हा मुंबईत येणार, असं मनोज जरांगे म्हणाले. अध्यादेशमध्ये सगेसोयरे शब्द आणणं सोपं नव्हतं. मात्र आम्ही करुन दाखवलं असंही मनोज जरांगेंनी सांगितले. तसेच न्यायालायात कोणी आव्हान दिलं, तर त्याची जबाबदारी सरकारची असणार आहे. मात्र हे होणार नाही. कायदा पारीत झाला आहे, असं मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतूनच गुलाल उधळत आम्ही सर्वजण आपापल्या घरी जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले.  

वाशीत जल्लोष-

Web Title: Manoj Jarange Patil said that this is the victory of the Marathas, not mine.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.