महिलेची हत्या करणाऱ्यास अटक

By Admin | Updated: November 15, 2016 04:56 IST2016-11-15T04:56:00+5:302016-11-15T04:56:00+5:30

पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथील साईलीला इमारतीत राहणाऱ्या अंजली प्रवीण पवार (२७) हिची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

The man who killed the woman was arrested | महिलेची हत्या करणाऱ्यास अटक

महिलेची हत्या करणाऱ्यास अटक

पनवेल : पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथील साईलीला इमारतीत राहणाऱ्या अंजली प्रवीण पवार (२७) हिची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
राजकुमार आदिनाथ पांडे (२८) असे आरोपीचे नाव आहे. अंजलीचे लग्न २०१४ मध्ये प्रवीण पवार याच्यासोबत झाले होते. त्यामुळे हत्येनंतर पहिला संशय तिच्या पतीवर घेण्यात आला. मात्र २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाल्याचे उघड झाले आहे. अंजली वेश्या व्यवसाय करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे आकुर्ली येथील साईलीला इमारतीत तिला भेटायला कोणकोण येत होते, याचा तपास खांदेश्वर पोलिसांनी सुरू केला.
अंजलीच्या शेजारी मोनिका नावाची महिला पती राजकुमार पांडेसह राहात होती. ३ नोव्हेंबरला मोनिका आपल्या मैत्रिणीसह गोव्यात गेली होती. त्या रात्री पांडे हा दारू पिऊन अंजलीच्या खोलीत गेला आणि तिच्याबरोबरच बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अंजलीने विरोध केल्याने पांडेने शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केले.
चार दिवसांनी साईलीला इमारतीतील रहिवाशांना अंजलीच्या खोलीतून उग्र वास आल्याने त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली. हत्येपासून पांडे गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्यावर जवळपास २० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (वार्ताहर)

Web Title: The man who killed the woman was arrested