नवी मुंबई - नवी मुंबईमध्ये डेटिंग ॲपच्या नावाखाली महिला बनून एका तरुणाची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरने येथील प्रकरण असून, आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी देहरादून येथून केली अटक केली आहे.
दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून फिर्यादी आणि आरोपी संजय कैलासचंद मीना यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. आरोपीने फिर्यादीसोबत Bumble App द्वारे व सोशल मीडियाद्वारे संपर्क करून प्रेमाचे नाटक करत जाळ्यात ओढले. त्यानंतर फिर्यादीकडून ३३ लाख ३७ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचं समजतच फिर्यादीने नवी मुंबई सायबर क्राईम पोलीस सोबत संपर्क साधला आणि आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.
ठाकरे गटाला आणखी एक धक्का; जिल्हाप्रमुखांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’, शिंदेसेनेत केला प्रवेश
यानंतर सायबर पोलिसांनी तपास केला असता आरोपीला उत्तराखंड येथील देहरादूनमधून अटक केली आहे. तर अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका असं आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी केले आहे.
मिळालेली माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांपासून फिर्यादी आणि आरोपी संजय कैलासचंद मीना यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. आरोपीने फिर्यादीसोबत Bumble App द्वारे व सोशल मीडियाद्वारे संपर्क करून प्रेमाचे नाटक करत जाळ्यात ओढले. त्यानंतर फिर्यादीकडून ३३ लाख ३७ हजार रुपये घेऊन फसवणूक केली.
आरोपी हा मुळचा जयपूरचा राहणारा असून तो देहरादूनला राहत होता. त्यानं तिथं गाडी खरेदी केली होती. ती गाडी तसंच चार फोन आणि एक मॅगबूक पोलिसांनी जप्त केली.