शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शहरात ग्राहकांविना मॉल पडले ओस; किमतीत सवलत मिळूनही प्रतिसाद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 23:36 IST

शहरात इनॉर्बिट, रघुलीला, सेंटर वन, तसेच ग्रँड सेंट्रल असे मोठमोठे मॉल आहेत. यापूर्वी पामबीच मार्गावरील पामबीच मॉलही ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण बनले होते.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरातील मॉल सहा महिन्यांनी पुन्हा एकदा सुरू होऊनही ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे लॉकडाऊनपूर्वी नेहमी गजबजलेले मॉल ओस पडल्याचे दिसून येत आहेत. सहा महिन्यांतील तोटा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी मॉलमधील व्यावसायिकांनी किमतीमध्ये सवलती देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने, अनेक व्यवसाय डबघाईला आले आहेत.शहरात इनॉर्बिट, रघुलीला, सेंटर वन, तसेच ग्रँड सेंट्रल असे मोठमोठे मॉल आहेत. यापूर्वी पामबीच मार्गावरील पामबीच मॉलही ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण बनले होते. त्यानंतर, शहरातील वाढत्या मॉलमुळे खरेदीदारांमध्ये मॉल संस्कृती तयार झाली होती, तर मॉलमधील इतर मनोरंजनाची साधने, फूड कोर्ट यामुळे सहज फेरफटका मारणाऱ्यांकडून नकळत खरेदी केली जायची. त्यात तरुण-तरुणींचा अधिक समावेश असायचा. मात्र, मार्चमध्ये लॉकडाऊन घोषित केल्याने मागील सहा महिन्यांपासून बंद असलेल्या मॉल्सचे शटर नुकतेच उघडले आहेत. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेत, व्यवसाय करण्यास मॉल व्यवस्थापनांना प्रशासनाने अनुमती दिली आहे. त्यानुसार, पुन्हा एकदा सर्व मॉल सुरू झाले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत मॉलमधील दुकाने आहे, त्या स्थितीत बंद राहिल्याने, त्यामधील मालाचे नुकसान होऊ लागले होते. त्यात कपडे व लेदरचे साहित्य असलेल्या व्यावसायिकांचा समावेश होता. यामुळे पुन्हा एकदा मॉल सुरू झाल्याने, सहा महिन्यांत झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न मॉलमधील व्यावसायिकांकडून सुरू आहे, परंतु नवी मुंबईत अद्यापही कोरोना अपेक्षित असा नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे मॉल सुरू होऊनही त्या ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी विविध वस्तूंच्या किमतीवर सवलतीची घोषणा करण्यात आली आहे. ३० ते ५० टक्क्यांपर्यंतच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, यानंतरही तुरळक ग्राहक खरेदीसाठी येत असल्याची खंत व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. एक ते दीड लाख रुपये भाड्याने अनेक व्यावसायिकांनी मॉलमधील जागा घेतल्या आहेत. त्यामुळे किमान भाडे तरी नफ्यातून सुटावे, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.फूड कोर्ट बंदच : मॉलमधील बैठक व्यवस्था हटविण्यात आली आहे, तर फूड कोर्टही बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळेही मॉलकडे वळणारे पाय कमी झाले आहेत. याचा परिणाम व्यवसायांवर दिसून येऊ लागला आहे. अशीच परिस्थिती अधिक काही काळ राहिल्यास शहरात उदयास आलेली मॉल संस्कृती मोडीत निघण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस