नादुरुस्त NMMT बसमुळे दोन तास वाहतूककोंडी, दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 17:54 IST2023-10-27T17:45:33+5:302023-10-27T17:54:43+5:30
विद्यार्थी, नोकरदार, वाहनचालकांना सहन करावा लागला नाहक त्रास

नादुरुस्त NMMT बसमुळे दोन तास वाहतूककोंडी, दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
मधुकर ठाकूर, उरण: फुंडे हायस्कूल -जेएनपीए दरम्यान एनएमएमटी बस बंद पडल्याने दोन्ही बाजूला मागे पुढे सुमारे दोन किमी अंतरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फुंडे हायस्कूल -जेएनपीए दरम्यान एक एनएमएमटी बस अचानक नादुरुस्त झाल्याने बंद पडली.मात्र आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर सुमारे तासभर वाहतूकीची कोंडी झाली होती. या वाहतूकीच्या कोंडीमुळे फुंडे हायस्कूल -जेएनपीए दरम्यान एनएमएमटी बस बंद पडल्याने दोन्ही बाजूला मागे पुढे सुमारे दोन किमी अंतरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. याचा नाहक त्रास विद्यार्थी, नोकरदार, वाहनचालकांना सहन करावा लागला. वाहतुक नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तासभर वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र मार्गातून नादुरुस्त बस हलविण्यात आल्यानंतरच वाहतूक सुरळीत झाली.