मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचं वर्चस्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 12:54 IST2020-03-02T12:42:50+5:302020-03-02T12:54:39+5:30

एपीएमसी निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश

maharashtra vikas aghadi dominating mumbai apmc election | मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचं वर्चस्व 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचं वर्चस्व 

नवी मुंबई- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.  कोकण महसूल विभागातून शेकापचे राजेंद्र पाटील विजयी झाले आहेत. तर पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
 
बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमधून माजी संचालक अशोक वाळुंज निवडून आले आहेत. त्यांनी राजेंद्र शेळके यांचा पराभव केला. भाजी मार्केटमधून शंकर पिंगळे विजयी झाले असून त्यांनी त्यांनी के. डी. मोरे यांचा पराभव केला. मसाला मार्केटमधून मोठी संचालक किर्ती राणा पराभूत झाले असून तेथे विजय भुत्ता विजयी झाले आहेत. धान्य मार्केटमधून निलेश विरा विजयी झाले आहेत. कामगार मतदार संघातून शशिकांत शिंदे व फळ मार्केट मधून संजय पानसरे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे बाळासाहेब सोईस्कर आणि काँग्रेसचे  धनंजय वाडकर पुढे आहेत. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शनिवारी ९२.५७ टक्के मतदान झालं होतं. एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान झालं. सहा महसूल विभागांमधून १२ शेतकरी प्रतिनिधी व चार व्यापारी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी हे मतदान घेण्यात आलं. या निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीचा प्रयोग आला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेकापनं पॅनल तयार केलं होतं. तर भाजप नेत्यांनीही काही उमेदवारांना ताकद दिली होती. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सहकार, कृषी क्षेत्रातील अनेकांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. सहा महसूल विभाग व व्यापारी मतदारसंघांमध्ये एकूण १७ हजार ५१३ मतदार होते. महसूल विभागांमध्ये तब्बल ९८.७२ टक्के मतदान झालं होतं, तर व्यापारी मतदारसंघामध्ये ८७.२१ टक्के मतदान झालं. अमरावतीमध्ये ९९, कोकणामध्ये ९९.६४, पुण्यामध्ये ९९ टक्के मतदान झालं होतं.

Web Title: maharashtra vikas aghadi dominating mumbai apmc election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.