Vidhan Sabha 2019: बेलापूरमध्ये आता तिकिटासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:17 PM2019-09-24T23:17:40+5:302019-09-24T23:18:17+5:30

भाजपसमोर पेच; युतीच्या वाटाघाटीवर सेनेच्या उमेदवारीचे भवितव्य

Maharashtra Vidhan Sabha 2019 A rope for tickets now in Belapur | Vidhan Sabha 2019: बेलापूरमध्ये आता तिकिटासाठी रस्सीखेच

Vidhan Sabha 2019: बेलापूरमध्ये आता तिकिटासाठी रस्सीखेच

Next

- कमलाकर कांबळे 

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली आहे. त्यानुसार सर्वच मतदारसंघांत इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. भाजपच्या विद्यामान आमदार मंदा म्हात्रे यांनी या जागेवर आपला प्रबळ दावा केला आहे. तर अलीकडेच राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे तिकीट वाटपाचा हा घोळ मिटविताना भाजपची कसरत होणार आहे.

विधानसभेच्या २0१४ मधील निवडणुकीत नाईक यांचा पराभव करून मंदा म्हात्रे जायंट किलर ठरल्या होत्या. निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन म्हात्रे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. तर शिवसेनेने विजय नाहटा यांना रिंगणात उतरविले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती. यात मोदी लाटेचा करिष्मा मंदा म्हात्रे यांच्या पथ्यावर पडल्याने त्या अवघ्या दोन हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या. आमदार म्हणून त्यांनी पाच वर्षांत विविध कामांची पूर्तता केली. मतदारसंघात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना दिली. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर विधानसभेत चर्चा घडवून आणली. मतदारसंघातील जनसंपर्क कायम ठेवला. त्यामुळेच पक्षाकडून यावेळीसुद्धा आपणालाच संधी मिळेल, असा विश्वास त्यांना वाटतो आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले गणेश नाईक यांनीसुद्धा बेलापूरमधून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी स्वत:हून तसे संकेत दिले नसले तरी त्यांच्या समर्थकांकडून मात्र बेलापूरमधून त्यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तशा अशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. गणेश नाईक हे राज्यातील वजनदार नेते आहेत. तसेच त्यांच्या पक्षांतरामुळे नवी मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता स्थापन होणार आहे. शिवाय त्यांचा प्रदीर्घ अनुभवाचा फायदा ठाणे जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्यासाठी होणार आहे. तर मंदा म्हात्रे या विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या कामाचा आलेखही चांगला आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून तिकीट वाटपात कोणाला झुकते माप मिळते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 A rope for tickets now in Belapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.