शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
3
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
4
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
5
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
6
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
7
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
8
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
9
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
10
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
11
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
12
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
13
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
14
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
15
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
16
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
17
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
18
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
19
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
20
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप

Vidhan Sabha 2019: एकाच टप्प्यात निवडणुका असल्याने दुबार मतदानाचा धोका टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 02:14 IST

चाकारमान्यांना गावच्या नेत्यांचे साकडे; नवी मुंबई, मुंबईतील मतदानावर परिणामाची शक्यता

- नामदेव मोरे नवी मुंबई : संपूर्ण राज्यात एकाच टप्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे दुबार मतदान होण्याचा धोका टळला आहे. चाकरमान्यांना गावाकडे यावे यासाठी स्थानिक नेत्यांनी साकडे घालण्यास सुरवात केली आहे. यामुळे यावेळीही मतदारांची पळवापळवी होणार असल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे नवी मुंबई, मुंबईसह ठाणे परिसरातील काही मतदार संघातील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये २०१४ च्या लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गावाकडे मतदान करा व नंतर मुंबईत येवून येथेही मतदान करा असे आवाहन केले होते. दुबार मतदानासाठी केलेल्या आवाहनामुळे खळबळ उडाली होती. वास्तवीक कोकण व पश्चिीम महाराष्ट्रामधील नागरिकांची मुंबईमध्येही मतदार यादीमध्ये नावे असून मुळ गावाकडील मतदार संघामध्येही अनेकांची मतदार यादीमध्ये नावे आहेत. याशिवाय अनेक मुंबईकर गावाकडे कार्यकर्त्यांची भुमीका बजावत असतात.दोन पेक्षा जास्त टप्यात मतदार झाले की काहीजण गावाकडे जावून मतदार करतात व पुन्हा मुंबईमध्ये येवून मतदार करत असतात. परंतु विधानसभा निवडणुका एकाच टप्यात होणार असल्यामुळे आता दोन ठिकाणी नावे असली तरी मतदान एकाच ठिकाणी करता येणार आहे.या मतदार संघात प्राबल्यसातारा जिल्ह्यातील सातारा,वाई, माण, पाटण, कोरेगाव मतदार संघामध्ये मुंबईमधील चाकरमान्यांचे प्राबल्य आहे. सांगलीमधील शिरूर, पुणे जिल्ह्यामधील भोर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर मतदार संघामध्ये मुंबईतून जाणारे कार्यकर्ते व मतदारांची भुमीका महत्वाची असते.या मतदार संघावर होणार परिणाम मतदारांचे स्थलांतर झाल्यास नवी मुंबईमधील ऐरोली, बेलापूर, पनवेल या मतदार संघातील मतदानावर परिणार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध पक्षाच्या येथील उमेदवारांना स्थलांतर रोखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.झालेले मेळावेलोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांनी नवी मुंबईमधील संपर्क वाढविला आहे. यामध्ये सातारा मतदार संघाचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, अमीत कदम, भोर चे आमदार संग्राम थोपटे, शिरूर मतदार संघातील काही नेत्यांनी येथे कार्यकर्त्यांच्या बैठका व मेळावे घेतले आहेत.गावाकडे झालेल्या मेळाव्याला मुंबईतील प्रमुख कार्यकर्त्यांना आग्रहाने बोलावून घेण्यात आले होते. रविवारी २२ सप्टेंबरला सातारामध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यालाही नवी मुंबईमधून शेकडो कार्यकर्ते रवाना झाले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019