शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 12:05 IST

अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंबई - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवारी (25 जुलै)  मुंबई, ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. मुंबईतील बंदचे पडसाद राज्यभर उमटल्याचे दिसून आले. कळंबोलीत या बंदला हिंसक वळण लागले, तर अनेक ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबईतील अनेक भागांमधील मोबाईल इंटरनेट सेवा गुरुवारी बंद करण्यात आली आहे.  

शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर, पामबीच मार्ग तसेच पनवेलमधील कळंबोली येथे जमावाने जाळपोळ केली. घणसोली, ऐरोली येथे रेल रोको करण्यात आला. मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केली. सध्या नवी मुंबईत शांतता असली तरी अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नवी मुंबईसह पनवेलमध्ये देखील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सरकारच्या सूचनेनुसार इंटरनेट सेवा ही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे असे मेसेज कंपनीने आपल्या ग्राहकांना पाठवले आहेत. खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल परिसरात हजारो इंटरनेट यूजर्सना याचा फटका बसला आहे.

टॅग्स :InternetइंटरनेटNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद