शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

मुरूडमध्ये महाआघाडीच्या प्रचार रॅलीस प्रतिसाद

By admin | Updated: November 18, 2016 03:26 IST

मुरुड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी, शेकाप व काँग्रेस आय पक्षाची महाआघाडी झाली असून

नांदगाव/ मुरुड : मुरुड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी, शेकाप व काँग्रेस आय पक्षाची महाआघाडी झाली असून नुकत्याच काढलेल्या प्रचार रॅलीस मोठा प्रतिसाद लाभला आहे. या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात ही प्रचार रॅली काढली. या प्रचार रॅलीत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मनोज भगत, नाना गुरव, विश्वास चव्हाण, मनोहर बैले, मनोहर मकू, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मुग्धा दांडेकर, बाबा दांडेकर आदींसह असंख्य कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या रॅलीव्दारे बाजारपेठ, कालभैरव मंदिर, गणेश पाखाडी आदी भागांतून प्रचार करण्यात येऊन आपल्याच आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.या वेळी तालुका चिटणीस मनोज भगत यांनी, गेल्या पाच वर्षांत मुरु ड नगरपरिषद विभागात आमदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे झालेली असून लोकांचा प्रमुख पाणीप्रश्नही सुटल्याने शहरातील सर्व जनता आघाडीवर खूश असून येणाऱ्या दिवसांत नगरपरिषदेवर आघाडीची सत्ता पाहावयास मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रचार रॅलीत असंख्य झेंडे फडकवून आघाडीच्या घोषणा करून वातावरण निर्मिती केली. शेकडो लोकांच्या या प्रचार रॅलीमुळे मुरु ड शहरात आघाडीचा जोर दिसून आला. (वार्ताहर)