शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तळा पंचायतीत तीस पदे रिक्त

By admin | Updated: July 14, 2015 23:16 IST

येथील पंचायत समिती कार्यालयात विविध खात्यात तीस पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास विलंब होतो. ही पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

तळा : येथील पंचायत समिती कार्यालयात विविध खात्यात तीस पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास विलंब होतो. ही पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी नागरिकांची मागणी आहे. तळा पंचायत समितीमध्ये सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ सहाय्यक तीन पदे, विस्तार अधिकारी सांख्यिकी एक पद, आरोग्य पर्यवेक्षक एक पद, शिपाई दोन पदे, सहाय्यक लेखाधिकारी एक पद, पशुधन पर्यवेक्षक एक पद, कनिष्ठ अभियंता एक पद अशी एकूण या विभागात १० पदे रिक्त आहेत, तर ग्रामपंचायत विभागात तीन ग्रामसेवक पदे रिक्त आहेत. पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी दोन पदे, पशुधन पर्यवेक्षक एक पद, अशी तीन पदे रिक्त आहेत. स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना विभागात विस्तार अधिकारी (उद्योग) एक पद रिक्त आहे. शिक्षण विभागात गेली अनेक वर्षे गटशिक्षण अधिकारी हे पद रिक्त आहे. याबाबत अनेक वेळा वर्तमानपत्रातून ही गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आहे. हे गटशिक्षणाधिकारी पद त्वरित भरावे अशी नागरिकांची मागणी आहे. आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी एक पद, कनिष्ठ सहाय्यक एक पद, वाहनचालक एक पद, आरोग्य सेवक एक पद, शिपाई एक पद, सफाई कामगार एक पद, आरोग्य सेविका एक पद, अर्धवेळ परिचर एक पद अशी नऊ पदे रिक्त आहेत. (वार्ताहर)कामांना विलंब-महिला व बालकल्याण एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प विभागात पर्यवेक्षिका दोन पदे, कनिष्ठ सहाय्यक एक पद अशी तीन पदे रिक्त आहेत. तळा पंचायत समिती कार्यालयात विविध विभागात एकूण ३३ पदे रिक्त आहेत. ही पदे जिल्हा प्रशासनने लवकरात लवकर भरावीत, अशी नागरिकांची मागणी आहे. जेणेकरून पंचायत समितीचे विकासात्मक कामकाज सुरळीत चालेल. पंचायत समिती कार्यालयातून माहिती घेतली असता वरील माहिती प्राप्त झाली आहे.