सिडको लॉटरीला रिस्पॉन्स कमी; पसंतीच्या घरासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 08:15 IST2024-12-12T08:14:57+5:302024-12-12T08:15:15+5:30
सिडकोच्या माध्यमातून ६७ हजार घरे बांधली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी प्राप्त झाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे.

सिडको लॉटरीला रिस्पॉन्स कमी; पसंतीच्या घरासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या २६ हजार घरांच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ११ डिसेंबर रोजी अर्जनोंदणीची मुदत संपली. या काळात एक लाखापेक्षा अधिक ग्राहकांनी अर्जनोंदणी केली आहे. अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ घेता यावा, या दृष्टीने सिडकोने ही मुदत २६ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे.
सिडकोच्या माध्यमातून ६७ हजार घरे बांधली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी प्राप्त झाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. त्यांतील २६ हजार घरांची योजना ११ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अखेरची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत होती; परंतु निवडणुकीच्या धामधुमीमुळे अनेकांना इच्छा असूनही ऑनलाइन अर्जनोंदणी करता आली नाही.
१ लाख १० हजार ग्राहकांची नोंदणी
nघरांच्या किमती जाहीर न केल्याने इच्छुक ग्राहक संभ्रमात आहेत. त्यामुळे अनेकांनी इच्छा असूनही ऑनलाइन अर्ज केलेला नाही. परिणामी अर्जनोंदणीचा अपेक्षित आकडा सिडकोला गाठता आलेला नाही.
nया योजनेंतर्गत १ लाख १० हजार ग्राहकांनी नोंदणी केली आहे, तर ३७ हजार ५०० अर्जदारांनी शुल्क भरले.