‘लोकमत पाठशाला’तर्फे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 23:44 IST2020-08-12T23:42:32+5:302020-08-12T23:44:21+5:30
ऑनलाइन स्पर्धा : १५ ऑगस्टपूर्वी पाठवा तुमच्या प्रवेशिका, मिळवा आकर्षक बक्षिसे

‘लोकमत पाठशाला’तर्फे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा
नवी मुुंबई : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘लोकमत पाठशाला’तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. देशभक्तीची चेतना मुलांच्या मनात फुलविण्याचे काम या स्पर्धेद्वारे दरवर्षीच केले जाते.
मुलांनो, या स्पर्धेत सहभागी व्हा आणि तुमची राष्ट्रभक्ती तुमच्या गाण्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू द्या. स्पर्धेत सहभागी होणे अत्यंत सोपे आहे. यासाठी पालकांनी त्यांच्या मुलांनी गायलेल्या राष्ट्रभक्तीपर आधारित गीताचा व्हिडीओ तयार करायचा आहे. हा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक टाइमलाइनवर शेअर करायचा आहे व लोकमत पाठशाला पेजला त्यासोबत टॅग करायचे आहे किंवा तुम्ही तुमच्या गायनाचा व्हिडीओ थेट लोकमत पाठशाला पेजच्या टाइमलाइनवरही शेअर करू शकता. इन्स्टाग्राम पेजलाही हा व्हिडीओ तुम्ही अपलोड करू शकता.
दि. १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत अपलोड झालेले व्हिडीओ स्पर्धेसाठी गृहीत धरण्यात येतील. त्यामुळे त्वरा करा आणि देशभक्तीपर गीताचा एक छानसा व्हिडीओ अपलोड करा.
६ ते ९ वर्षे, १० ते १३ वर्षे आणि १४ ते १७ वर्षे या तीन वयोगटांत ही स्पर्धा घेतली जाईल.
स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील ‘लोकमत पाठशाला’ हे पेज लाईक करावे.
प्रत्येक गटातून प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले जाईल. तसेच प्रत्येक गटातून १० उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.
नोंदणी आवश्यक नोंदणीसाठी खालील लिंकवर नावे नोंदवावीत.
https://www.townscript.com/e/lokmat-pathshala-online-patrioticsong-competition-430444