शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Lockdown: नवी मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन अंमलबजावणी करण्याचे आव्हान; एपीएमसी सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 01:08 IST

अनधिकृत फेरीवाल्यांसह विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नवी मुंबई : कोरोनाचे सुरू असलेले थैमान थांबविण्यासाठी संपूर्ण नवी मुंबईमध्ये शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असले, तरी प्रत्यक्षात याची कडक अंमलबजावणी होणार का, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. पोलीस व मनपा प्रशासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी केली नाही, तर लॉकडाऊनचा फज्जा उडण्याची शक्यता आहे.

यापूर्वी पालिका व पोलीस प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली नव्हती. पामबीच रोड व मुख्य चौकात पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते, परंतु अंतर्गत रोडवर पेट्रोलिंग केले जात नव्हते. परिणामी, नागरिक विनाकारण घराबाहेर पडत राहिले व रुग्ण वाढले. शनिवारपासून पुन्हा दहा दिवस अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद केली जाणार आहेत, परंतु सद्यस्थितीमध्ये शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, तसेच नवी मुंबईमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवरही कडक कारवाई होत नाही. पुढील दहा दिवसांत काटेकोरपणे अंमलबजावणी केली, तरच कोरोना नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे.एपीएमसी सुरूच राहणारएपीएमसी मार्केटमध्ये रोज २० ते २५ हजार नागरिक नोकरी, व्यवसाय, खरेदीसाठी येत आहेत. मार्केटमुळे नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. यामुळे एपीएमसी सुरू ठेवून उर्वरित शहर बंद ठेवण्यात काहीही अर्थ नाही. एपीएमसी मार्केटही बंद ठेवण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी ही बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी केली आहे.नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनकोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले, तरच या उपाययोजनांना यश येणार आहे. नियमांचे पालन केले नाही, तर रुग्णसंख्या झपाट्याने वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.10,000 च्या दिशेने वाटचालनवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सात हजारांपेक्षा जास्त झाली आहे. सद्यस्थितीमध्ये प्रति दिन दोनशेपेक्षा जास्त वाढ होत आहे. ही वाढ थांबविली नाही, तर जुलै अखेरपर्यंत नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाने आता शासन व महानगरपालिकेवर अवलंबून न राहता, स्वत:च स्वत:ची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस