शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 01:35 IST

बुधवारी वाढवणला आलेल्या जेएनपीटीच्या अधिकाºयांना स्थानिकांनी खडे बोल सुनावत सर्वेक्षणाला आपला विरोध नोंदवला.

पालघर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कांदा निर्यात बंद करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्यानंतर वाढवण बंदर उभारणीच्या हालचाली सुरू करून बागायतदार, मच्छीमार व्यवसायावर गदा आणण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली आहे. बुधवारी वाढवणला आलेल्या जेएनपीटीच्या अधिकाºयांना स्थानिकांनी खडे बोल सुनावत सर्वेक्षणाला आपला विरोध नोंदवला.जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार, बागायतदार स्थानिकांचा वाढवण बंदराला विरोध असतानाही केंद्रातील मोदी सरकारने जबरदस्तीने वाढवण बंदर उभारणीच्या दिशेने आपले पाऊल उचलण्यास सुरुवात केली. बुधवारी मनोरच्या एका रिसॉर्टमध्ये जेएनपीटीचे अधिकारी, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ आदी अधिकाºयांची बैठक पार पडली. या बैठकीत पुढच्या वाटचालीची आखणी करण्यात आल्यानंतर मोठ्या पोलीस फौजफाट्यासह सर्व अधिकारी वाढवणच्या किनाºयावर पोचले.गावातील जागरूक नागरिकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत अधिकाºयांना येण्याचे प्रयोजन विचारले. यावेळी सर्वेक्षण करण्याच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी आलो असून आम्हाला सर्वेक्षण करू द्या. आपला विरोध जनसुनावणी आणि कायदेशीर बाबीने नोंदवा, असे जेएनपीटीच्या अधिकाºयांनी सांगताच हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना आपण प्राधिकरणाची कुठलीही परवानगी न घेता इथे कसे आला, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित करून जेएनपीटीविरोधात घोषणा दिल्या.केंद्र सरकारने पर्यावरणीय अवलोकन कायदा मसुदा २०२० बनवला असून त्यात अशी तरतूद केली आहे की, एखादा प्रकल्प केंद्राच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटला तर त्या संदर्भात जो काही पर्यावरणीय अहवाल बनवला जाईल, तो जनतेपुढे न आणता त्यात थेट प्रकल्प रेटण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. - प्रा. भूषण भोईर, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :JNPTजेएनपीटी