Navi Mumbai: चार दिवसांच्या "सोशल मैत्रीत" सोडली मर्यादा, खंडणीसाठी तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल
By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 16, 2024 18:49 IST2024-07-16T18:49:29+5:302024-07-16T18:49:57+5:30
Navi Mumbai Crime News: व्हिडीओ कॉलदरम्यान महिलेने केलेले आक्षेपार्ह कृत्य रेकॉर्ड करून तरुणाने तिच्याकडे २० हजाराची खंडणी मागितली. मात्र तरुणीने पैसे न दिल्याने सदर व्हिडीओ त्याने तिच्या नातेवाईक व मित्रांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

Navi Mumbai: चार दिवसांच्या "सोशल मैत्रीत" सोडली मर्यादा, खंडणीसाठी तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - सोशल मीडियावर झालेल्या अवघ्या चार दिवसांच्या मैत्रीत मर्यादा ओलांडणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. व्हिडीओ कॉलदरम्यान महिलेने केलेले आक्षेपार्ह कृत्य रेकॉर्ड करून तरुणाने तिच्याकडे २० हजाराची खंडणी मागितली. मात्र तरुणीने पैसे न दिल्याने सदर व्हिडीओ त्याने तिच्या नातेवाईक व मित्रांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
खारघर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. तिची चार दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एका तरुणासोबत ओळख झाली होती. या तरुणाने तो युके मध्ये राहत असल्याचे सांगून तिच्यासोबत ओळख वाढवली. यानंतर त्यांच्यात नियमित चॅटिंग सुरु असताना चौथ्या दिवशी तरुणाने तिला व्हिडीओ कॉल करून आक्षेपार्ह कृत्य करायला सांगितले. त्याच्या सांगण्याप्रमाणे तरुणीने केलेले कृत्य तरुणाने रेकॉर्ड करून काहीच वेळात तिच्याकडे २० हजाराची मागणी केली. मात्र आपल्याकडे पैसे नसल्याचे तिने सांगताच त्याने सदर आक्षेपार्ह व्हिडीओ तिच्या मित्र व नातेवाईकांना पाठवला. हा प्रकार निदर्शनात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.