शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गायछापचा वारसदार भासवून लावला चुना, फेसबुकची मैत्री महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 08:52 IST

फेसबुकवरील मैत्री पडली महागात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : गायछाप कंपनीच्या मालकाचा मुलगा असल्याचे भासवून महिलेला व्यवसायाच्या बहाण्याने ९३ लाखांचा चुना लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. फेसबुकवरून मैत्री वाढवून ही फसवणूक करण्यात आली आहे.

सानपाडा येथे राहणाऱ्या जमुना वडगाये यांच्यासोबत हा प्रकार घडला असून, त्या बदलापूर नगरपरिषदेचे लेखा विभागातील सहायक संचालक प्रवीण वडगाये यांच्या पत्नी आहेत. २०१९ मध्ये त्यांची फेसबुकवर एका तरुणासोबत ओळख झाली होती. त्याने स्वतःचे नाव द्रिश मालपाणी असून, तो गायछाप कंपनीच्या मालकाचा मुलगा असल्याचे त्याने सांगितले होते. त्यांच्यातली ओळख अधिक वाढल्यावर त्याने संपत्तीवरून वडिलांसोबत आपला वाद झाला असून, तो वेगळा राहत असल्याचे सांगितले. मात्र, आपण पुण्यात क्लब सुरू करणार असून त्यात पैसे गुंतवल्यास दोन वर्षांत दुप्पट रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून जमुना यांनी रोख व दागिन्यांची मोड करून ९३ लाख १६ हजार रुपये द्रिश या तरुणाला दिले. दरम्यान, व्यवहाराचा करार करण्याचे ठरले असतानाही तो रक्कम घेऊनही वेळोवेळी चालढकल करत होता. त्यानंतरही वडिलांसोबत संपत्तीवरून खटला सुरू असल्याचे सांगून, लवकरच पैसे परत करतो असे सांगून अधिक रकमेची मागणी करू लागला. त्यानंतर मात्र जमुना यांनी त्याच्याकडे पाठपुरावा केला असता, त्याने फेसबुक व मोबाइलवर ब्लॉक करून संपर्क तोडला.

आर्थिक परिस्थितीची घेतली माहितीnसंगमनेर येथे जाऊन प्रत्यक्षात उद्योगपती मालपाणी यांच्याविषयी चौकशी केली असता, द्रिश नावाचा त्यांना कोणी मुलगा नसल्याचे समोर आले. nशिवाय अनोळखी व्यक्तीने त्यांना मालपाणी यांचा मुलगा असल्याचे भासवून फसवणूक केल्याचेही उघड झाले. nयानुसार त्यांनी सानपाडा पोलिसांकडे तक्रार केली असता, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. nदरम्यान वडगाये यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती काढून संबंधिताने त्यांना हा गंडा घातल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFacebookफेसबुकPoliceपोलिस