मनपाची ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:39 PM2019-09-16T23:39:39+5:302019-09-16T23:39:50+5:30

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ११ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता हीच सेवा ही राष्ट्रव्यापी मोहीम राबविली जात आहे.

Launching of Municipal 'Sanitation only service' campaign | मनपाची ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम सुरू

मनपाची ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम सुरू

Next

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ११ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता हीच सेवा ही राष्ट्रव्यापी मोहीम राबविली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्येही हे अभियान सुरू केले असून शहरात ठिकठिकाणी श्रमदान करून साफसफाई केली. सोसायट्यांसाठी कार्यशाळेचेही आयोजन केले होते.
या उपक्र मांतर्गत वाशी सेक्टर ८ येथे सागर विहार याठिकाणी श्री सत्य साई सेवा संस्था, एसआयईएस कॉलेज नेरु ळ, आलूमनाई ट्रस्ट आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता कार्यक्र म राबविण्यात आला. यावेळी परिसरामध्ये साफसफाई करण्यात आली ६६ स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वच्छताप्रेमी नागरिक तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे उप मुख्य स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे, स्वच्छता निरीक्षक कविता खरात, उप स्वच्छता निरीक्षक विजय काळे उपस्थित होते. निर्माल्य तसेच प्लॅस्टिक व थर्माकोल असे वर्गीकरण करण्यात येऊन श्रमदानाव्दारे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेण्यात आला व प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबईची प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली. यावेळी नेरुळ विभाग अधिकारी संजय तायडे, स्वच्छता निरीक्षक जयश्री अढाळ, उप स्वच्छता निरीक्षक वीरेंद्र पवार उपस्थित होते.
महापालिका शाळा क्र . १0४, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय, से. ४, नेरूळ येथील शालेय विद्यार्थ्यांचे कचरा वर्गीकरणविषयी प्रबोधन करण्यात आले आणि प्लॅस्टिक व थर्माकोलमुक्त नवी मुंबईची सामूहिक प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली. २७ आॅक्टोबरपर्यंत होणाऱ्या अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व महापौर जयवंत सुतार यांनी केले आहे.

Web Title: Launching of Municipal 'Sanitation only service' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.