शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

करावे गावातील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 23:43 IST

नवी मुंबई शहरातील स्थानिक प्रकल्पग्रस्त आगरी, कोळी नागरिकांचा मासेमारी हा व्यवसाय आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील स्थानिक प्रकल्पग्रस्त आगरी, कोळी नागरिकांचा मासेमारी हा व्यवसाय आहे. करावे गावातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना मासेमारी करण्यासाठी पामबीच मार्ग ओलांडून खाडीकडे ये-जा करावी लागते. पामबीच मार्ग ओलांडताना आजवर अनेक अपघात होऊन अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या लढ्यानंतर पालिकेने या मार्गाखालून भुयारी मार्ग बांधण्यास सुरु वात केली असून या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या भुयारी मार्गामुळे मासेमारी करणाऱ्या नागरिकांना पामबीच मार्ग ओलांडणे सुकर झाले असून मोठा दिलासा मिळाला आहे.नवी मुंबई शहर हे नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर वसले आहे. या प्रकल्पग्रस्त नागरिकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असून करावे गावातील बहुतांश नागरिकांचा आजही मासेमारी हा व्यवसाय आहे. या नागरिकांना मासेमारी करण्यासाठी खाडीच्या दिशेने ये-जा करावी लागते. गाव आणि खाडी यांच्यामध्ये असणारा पामबीच मार्ग ही ग्रामस्थांची मोठी समस्या बनली होती. पामबीच मार्गावरून भरधाव वेगाने धावणाºया वाहनांना चुकवीत रस्ता ओलांडताना या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत. यामध्ये काही ग्रामस्थांना इजा झाल्या तर काही ग्रामस्थांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. करावे गावातून पाम बीच मार्गाच्या पलीकडे ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग बनविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांनी सुमारे ९ वर्षांपूर्वी करून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा देखील केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी देखील भुयारी मार्गासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. सभागृहात भुयारी मार्ग बनविण्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती. मंजुरी मिळून देखील पालिका प्रशासन कामाला विलंब करीत असल्याने नगरसेवक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली करावे ग्रामस्थांनी पामबीच मार्गावर रास्ता रोको करून पालिका मुख्यालयावर मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर प्रशासनाने या कामाची निविदा काढली होती. परंतु पामबीच मार्गावरील वाहनांची वर्दळ आणि जवळ आलेला पावसाळा यामुळे वाहतूक पोलिसांनी भुयारी मार्गाचे काम पावसाळा संपल्यावर सुरू करावे अशी सूचना करीत परवानगी नाकारली होती.पामबीच मार्गावरील वाहतूक सर्व्हिस रस्त्याने वळविण्यासाठी मार्ग बनविण्यात आला होता. सदर भुयारी मार्गाचे काम करताना १७00 मिमी व्यासाची पाण्याची पाइपलाइन अडथळा ठरत असल्याने देखील या कामाला विलंब झाला. पाण्याची पाइपलाइन देखील स्थलांतरित करण्यात आली. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. आता या मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या भुयारी मार्गामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.