विमानतळबाधितांचे स्थलांतर अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:20 IST2019-01-14T23:18:01+5:302019-01-14T23:20:04+5:30
१५ जानेवारी अंतिम मुदत : सिडकोच्या आवाहनाला ग्रामस्थांचा प्रतिसाद

विमानतळबाधितांचे स्थलांतर अंतिम टप्प्यात
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या ‘त्या’ दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. स्थलांतरासाठी सिडकोने दिलेली मुदत १५ जानेवारी रोजी संपत आहे. शेवटच्या दिवसात स्थलांतराची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणारी दहा गावे स्थलांतरित केली जात आहेत. या गावांचे वडघर, वाहळ आणि कुंडे वाहळ या ठिकाणी पुनर्वसन व पुन:स्थापना करण्यात येत आहे. दहा गावातून स्थलांतरित होणाºया कुटुंबांची संख्या ३000 इतकी आहे. स्थलांतरित होणाºया ग्रामस्थांना यापूर्वी तीन वेळा मुदत देण्यात आली होती. पुनर्वसन पॅकेजसह प्रोत्साहन भत्ता सुध्दा जाहीर करण्यात आला होता. परंतु लहान मोठ्या मागण्यांचा रेटा पुढे करीत ग्रामस्थांनी स्थलांतराला विरोध दर्शविला. अखेर दहा गाव संघर्ष समितीच्या विनंतीनुसार उर्वरित ग्रामस्थांना स्थलांतरासाठी १५ जानेवारीची अंतिम मुदत देण्यात आली होती. ही मुदत उद्या संपत असून रविवारपर्यंत जवळपास ८0 टक्के ग्रामस्थांनी स्थलांतरासाठी अर्ज सादर केले आहे. तर दहापैकी वरचे ओवळा, वाघिवलीवाडी ही दोन गावे शंभर टक्के रिकामे झाली
आहेत.
कोपर , कोल्ही व चिंचपाडा या तीन गावांचे ९५ टक्के स्थलांतर झाले आहे. तरघर ८५ टक्के तर गणेशपुरी गावातील ७0 टक्के स्थलांतर पूर्ण झाले आहे. तसेच उलवेतील ५00 ग्रामस्थांपैकी ३00 ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. कोंबडभुजेमधील ३२५ पैकी १७0 ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. उद्याच्या शेवटच्या दिवसात १00 टक्के स्थलांतर होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
स्थलांतरासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन
आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अंतिम मुदतीत ग्रामस्थांनी स्थलांतर करावे, यासाठी सिडकोच्या वतीने विविध स्तरावर प्रयास करण्यात आले. सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी याप्रकरणात विशेष लक्ष घातले होते.
गाव स्तरावर बैठका घेवून ग्रामस्थांना स्थलांतरासाठी प्रोत्साहित केले. तसेच ग्रामस्थांनी वैयक्तिक पत्रे देवून अंतिम मुदतीचे स्मरण करून देण्यात आले. विशेष म्हणजे ग्रामस्थांच्या सोयीसाठी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही संबंधित कार्यालय सुरू ठेवण्यात आले. याचा परिणाम म्हणून मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थलांतराला मूर्त स्वरूप प्राप्त झाले.
स्थलांतर १५ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणतीही मुदत दिली जाणार नाही. उद्या अखेरचा दिवस असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या सोयीसाठी रात्री ८ वाजेपर्यंत संबंधित कार्यालय सुरू ठेवले जाणार आहे.
च्या कालावधीत सादर होणाºया अर्जाची पुढील दोन दिवसात तपासणी करून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल. दिलेल्या मुदतीत ज्यांनी स्थलांतर केले नाही, अशा प्रकल्पग्रस्तांच्या प्रकरणाबाबत यानंतर राज्य शासन निर्णय घेईल, असे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
वाघिवलीच्या स्थलांतराची घाई नाही
च्तरघर, कोंबडभुजे, उलवे, गणेशपुरी, वाघिवलीवाडा, वरचे ओवळे, कोल्ही, कोपर, चिंचपाडा आणि वाघिवली अशी स्थलांतरित होणाºया गावांची नावे आहेत. यापैकी वाघिवली हे गाव गाभा क्षेत्राच्या बाहेर असल्याने सध्या सिडकोला या गावाच्या स्थलांतराची घाई नाही. त्यामुळे या गावाचे स्थलांतर अद्याप शिल्लक आहे.