शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

जमीन हडपण्याचे भूमाफियांचे षड्यंत्र धुळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 2:53 AM

अनधिकृत चाळींवर हातोडा : शासनाच्या ७० एकर भूखंडावर चाळींचे बांधकाम; पनवेल महापालिकेची सर्वात मोठी कारवाई

पनवेल : किरवली-अडिवली परिसरामध्ये सरकारी जमीन हडपण्याचे षड्यंत्र पनवेल महापालिकेने उधळवून लावले. ७० एकर भूखंडावर उभारण्यात आलेल्या चाळींवर कडक बंदोबस्तामध्ये बुलडोजर चालविण्यात आला. येथील २० चाळींमधील १२५पेक्षा जास्त घरे जमीनदोस्त केली आहेत. पनवेल महापालिकेची ही सर्वात मोठी कारवाई असून, पुढील तीन दिवस मोहीम सुरू राहणार आहे.राज्यातील सर्वात कमी झोपडपट्ट्या असलेल्या महापालिकांमध्ये पनवेलचा समावेश होतो; परंतु सद्यस्थितीमध्ये भूमाफियांनी या परिसरामध्येही अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. तळोजा व शिळफाटा परिसराच्या बाजूला अतिक्रमणांचे प्रमाण वाढत आहे. किरवली परिसरामध्ये चक्क पक्क््या चाळींचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना देऊनही अनधिकृत गाळे व चाळी उभारण्याचे काम सुरूच होते. अखेर बुधवारी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ७० पालिकेचे कर्मचारी, दोन जेसीबी यांच्या साहाय्याने या अनधिकृत चाळी तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. या वेळी काही जणांनी या कारवाईत हस्तक्षेपदेखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालिका अधिकाºयांनी ते न जुमानता कारवाई सुरूच ठेवली. विशेष म्हणजे, संबंधित चाळी बांधणारे व घरे विकत घेणारे परप्रांतीयच असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या कारवाई दरम्यान ठाणे जिल्ह्यातील स्थानिक ग्रामस्थांनी मध्यस्ती करण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र, त्यांचा तो प्रयत्न निष्फळ झाला. या ठिकाणी चाळी बांधण्यामागे एक रॅकेट सक्रि य असून, हा घोटाळा हजारो करोडोंच्या घरात जाऊ शकतो. या ठिकाणी असलेल्या ७० एकर शासनाच्या जागेची किंमत ही हजारोंच्या घरात आहे. मात्र, त्याच्यावर घरे बांधण्याची परवानगी या भूमाफियांना कोणी दिली, हा प्रश्न या वेळी निर्माण झाला आहे. पालिकेत समाविष्ट २९ गावांचा अद्याप सिटी सर्व्हे झाला नसल्याने, या ठिकाणच्या ग्रामस्थांना आपली घरे दुरुस्त करण्याची परवानगी नसताना पालिका हद्दीत एवढ्या मोठ्या संख्येने चाळी कशा काय बांधल्या जातात. याबाबत चौकशी करण्याची मागणी नगरसेवक हरेश केणी यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्तांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी आयुक्त गणेश देशमुख हे स्वत: या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासह उपायुक्त जमीर लेंगरेकर, गणेश साळवी, श्रीराम हजारे, भगवान पाटील, दौलत शिंदे, अनिल कोकरे आदीसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संबंधित प्रकाराची चौकशी करण्याची मागणीसंबंधित जागा शासनाच्या मालकीची आहे तरीदेखील मोठ्या संख्येने या ठिकाणी चाळी व गाळे बांधण्याचा अधिकार या ठिकाणच्या भूमाफियांना कोणी दिला? एकीकडे प्रकल्पग्रस्तांच्या घरांना दुरु स्तीची परवानगी दिली जात नाही आणि दुसरीकडे भूमाफियांनी घातलेले थैमान याबाबत चौकशी करण्याची यावी, अशी मागणी नगरसेवक हरेश केणी यांनी केली आहे.बशीर पटेल कोण?या कारवाईदरम्यान मुंब्रा येथील बशीर पटेल नावाचा इसम वारंवार कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत होता. गरिबांची घरे कशाला तोडता, असा तो वारंवार पालिकेच्या अधिकाºयांना सांगत होता. शासनाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून परप्रांतीय बशीर पटेल पालिकेच्या कारवाईत अडथळा कसा काय आणू शकतो? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.पोलिसांच्या बंदोबस्ताविना कारवाईया कारवाईदरम्यान तळोजा पोलीस ठाण्याच्या मार्फत पोलीस बळ पुरविण्याची मागणी केली होती. मात्र, ऐन वेळेला इतर ठिकाणच्या बंदोबस्ताचे कारण देत पोलीस घटनास्थळी आलेच नाहीत. अशा वेळी पालिका कर्मचाºयांनी जीव मुठीत धरून या ठिकाणी कारवाई सुरूच ठेवली. या वेळी या ठिकाणच्या विरोध करणाºया नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाºयांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणpanvelपनवेल