शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला हक्कभंगाचा इशारा

By admin | Updated: September 12, 2015 02:20 IST

नवी मुंबई महापालिकेने आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेमध्ये भाषण करू न दिल्यामुळे बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

-  नामदेव मोरे,  नवी मुंबईनवी मुंबई महापालिकेने आयोजित केलेल्या गणेश दर्शन स्पर्धेमध्ये भाषण करू न दिल्यामुळे बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जाणीवपूर्वक राजकारण करून डावलण्यात आल्याचा आरोप केला असून महापालिकेवर हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिला आहे. बक्षीस वितरणापेक्षा मानापमान नाट्यामुळे हा कार्यक्रम गाजला. नवी मुंबई महानगरपालिकेने गतवर्षी घेतलेल्या गणेश दर्शन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव व क्रीडा शिष्यवृत्तीचे वाटप करण्यासाठी गुरुवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये क्रीडा व सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रकाश मोरे, महापौर सुधाकर सोनावणे, खासदार राजन विचारे व माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनाच भाषण करण्याची संधी देण्यात आली. बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांना भाषण करू दिले नाही. यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेने कार्यक्रमाला बोलावून जाणीवपूर्वक अपमान केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापौर व पालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी कार्यक्रमस्थळी धारेवर धरले होते. पूर्वी विधान परिषद सदस्य असल्याचे कारण सांगून पालिका डावलत होती. निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतरही डावलण्याचे सत्र सुरूच आहे. हा निवडून दिलेल्या जनतेचा अपमान आहे. महापालिकेच्या या कृतीविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही नाराजी व्यक्त केली. बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये प्रथमच सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर आले होते. राष्ट्रवादी सोडल्यानंतर जवळपास ८ वर्षांनी विजय चौगुले गणेश नाईक यांच्यासोबत व्यासपीठावर बसले होते. गत दोन वर्षांपासून मंदा म्हात्रे - नाईक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. परंतु हे दोघेही या कार्यक्रमास उपस्थित होते. परंतु एकाच व्यासपीठावर आल्यानंतर हा कार्यक्रम बक्षिसांपेक्षा मानापमानामुळेच गाजला. भाषण करण्यास आमदार व विरोधी पक्षनेत्यांना संधी दिली नाही. यानंतर बक्षीस वितरण करताना गणेश नाईक बक्षीस देताना शिवसेना व भाजपाचे नेते खुर्चीवर बसून रहात होते. मंदा म्हात्रे यांच्या हस्ते बक्षीस देताना गणेश नाईक व राष्ट्रवादीचे पालिकेतील पदाधिकारी खालीच बसून रहात होते. यामुळे या सर्वांमधील मतभेद सर्वांच्या लक्षात आले. किमान गणेश दर्शनसारख्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तरी राजकारण केले नाही पाहिजे होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. पूर्वी विधान परिषद सदस्य असल्यामुळे महापालिका सार्वजनिक कार्यक्रमात डावलत होती. आता विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही मतदार संघातील कार्यक्रमात भाषण करू दिले नाही. जे निवडणुकीत पडले त्यांना अधिक महत्त्व देण्यात आले. जाणीवपूर्वक लोकप्रतिनिधींचा अपमान केल्यामुळे महापालिकेवर हक्कभंग दाखल करणार आहे. - मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर मतदार संघ