शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोथळीगडाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष, संवर्धनासाठी प्रयत्नच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 00:02 IST

स्वराज्याचे शस्त्रागार म्हणून इतिहासात नोंद असलेल्या कोथळीगडाकडे केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : स्वराज्याचे शस्त्रागार म्हणून इतिहासात नोंद असलेल्या कोथळीगडाकडे केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. संरक्षित स्मारक म्हणून येथील गुहेची नोंद करण्यात आली असली, तरी संपूर्ण गडाच्या संवर्धनासाठी काहीही खर्च केला जात नाही. गडाचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शिवप्रेमींनी विशेषत: सह्याद्री प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. तीन वर्षांपासून संवर्धन मोहिमा राबविल्या जात आहेत. गडावरील तोफांना लाकडी गाडा तयार केला असून, नुकताच गडावर दरवाजाही बसविण्यात आला आहे.कर्जत तालुक्यामधील पेठचा किल्ला अर्थात कोथळीगडास मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शस्त्रसाठा ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. रायगड जिल्ह्यामधील कर्नाळा, इरशाळगड, कलावंतीन दुर्ग व कोथळीगडाच्या शिखरावरील दगडी सुळका ट्रेकर्सना आकर्षित करत असतो. इतर सर्व गडांवर कातळ फोडून शिखरावर जाण्यासाठी पायऱ्या किंवा वाट बनविण्यात आली आहे; परंतु कोथळीगडावर मात्र खडक फोडून आतमधून शिखरापर्यंत जाणारा पायरी मार्ग तयार करण्यात आला आहे. यामुळे देशभरातील शिवभक्त या खडकामधून मार्ग पाहण्यासाठी गडाला भेट देत असतात. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारकाच्या यादीमध्ये या गडाचाही समावेश केला आहे; परंतु प्रत्यक्षात गडावरील संरक्षित स्मारकाचा फलक वगळता इतर काहीही काम अद्याप करण्यात आलेले नाही. पुरातत्त्व विभागाच्या पाटीवरील मजकूरही पुसला गेला असून, नवीन फलक लावण्याची तसदीही अद्याप घेण्यात आलेली नाही. शिवप्रेमींनी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप गड संवर्धनासाठी फारसे प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.स्वराज्याचे शस्त्रगार म्हणून ओळख असलेल्या या गडाचे संवर्धन करण्यासाठी जवळपास तीन वर्षांपासून सह्याद्री प्रतिष्ठानने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रतिष्ठानच्या कर्जत विभागाच्या वतीने महिन्यातून किमान दोन वेळा संवर्धन मोहीम राबविली जात आहे.गडावरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई केली जात आहे. दरवाजा, पायरी मार्ग, गुहा, भुयारी मार्ग, शिखरावरील तलाव व इतर दुरुस्तीची कामेही केली जात आहेत. गडाच्या पायथ्याशी असलेल्या उखळी तोफेला लाकडी गाडा तयार करण्यात आला आहे. गडावरील दोन तोफा बुरुजावर सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांनाही लाकडी गाड्यावर बसविण्यात आल्या आहेत.दोनपैकी एक लोखंडी व एक पितळी तोफ आहे. गडाच्या बालेकिल्ल्यावर प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच दरवाजा बसविण्यात आला आहे. पेठ गावातून गडावर जाणाºया मार्गावर जवळपास नुकतीच विरगळ आढळून आली असून, तीही सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुरातत्त्व विभागाने साथ दिल्यास कोथळीगडाचे बुरूज व इतर अवशेष टिकविण्यास मदत होऊ शकते, असे मत शिवप्रेमींनी व्यक्त केले आहे.>काय आहे गडावरकोथळीगडावर जाताना पेठ गावामध्ये उकळी तोफ पाहावयास मिळते. गडावर दोन तोफा आहेत. गडावर जाणाºया वाटेवर एक विरगळ पाहावयास मिळते.गडाच्या शिखरावर जाण्यासाठी खडक फोडून पायऱ्यांचा भुयारी मार्ग तयार केला आहे. गडाच्या चारही बाजूला खडकामध्ये पाण्याचे टाके तयार केली आहेत.वर्षभर गडावर पाणी उपलब्ध असून, उन्हाळ्यात पेठ गावाला येथून पाणीपुरवठा होतो. मुख्य दरवाजाजवळ दोन हत्तीचे तोंड असलेली शिल्प आहेत.गडावर पुरातन गुहा असून त्याच्या खांबांवर शिल्प कोरली आहेत. आतमधील दरवाजावरही नक्षीकाम केले आहे.गुहेत प्रवेश करण्याच्या ठिकाणी दुसºया छोट्या गुहेत मंदिर आहे. गडावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने संवर्धनाचे काम सुरू असून वनविभागाकडूनही रस्ता, पायवाटा करण्यासाठी कामे होत आहेत. दोनपैकी एक लोखंडी व एक पितळी तोफ आहे. गडाच्या बालेकिल्ल्यावर प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच दरवाजा बसविण्यात आला आहे.>कोथळीगडाच्या पायथ्याशी असणाºया पेठ गावापर्यंत जाण्यासाठी सद्यस्थितीमध्ये कच्चा रोड करण्यात आला आहे. वनविभागाच्या वतीने सकारात्मक कामे सुरू आहेत. हा रोड अजून व्यवस्थित केल्यास पर्यटक मोठ्या प्रमाणात गडाला भेट देऊ शकतील. गडाची माहिती देणारे फलक सर्वत्र लावणे आवश्यक आहे.- सुशांत शिंदे, शिवप्रेमी, नेरुळ