अपहृत अल्पवयीन मुलीची मुंबईतून सुटका, परिचयाच्याच व्यक्तीनं नेलं होतं पळवून
By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 20, 2022 17:59 IST2022-09-20T17:58:49+5:302022-09-20T17:59:20+5:30
कोपर खैरणे येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची देवनार येथून सुटका करण्यात आली आहे.

अपहृत अल्पवयीन मुलीची मुंबईतून सुटका, परिचयाच्याच व्यक्तीनं नेलं होतं पळवून
नवी मुंबई : कोपर खैरणे येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची देवनार येथून सुटका करण्यात आली आहे. परिचयाच्या मुलाने तिला फूस लावून पळवून नेले असल्याची माहिती समोर आली होती. त्याद्वारे गुन्हे शाखा पोलिसांनी तिचा शोध घेऊन नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
एक वर्षांपूर्वी कोपर खैरणे परिसरातून ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी कोपर खैरणे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपासात रुपेश कंठे याने तिला पळवून नेले असल्याची माहिती समोर आली होती. त्याद्वारे गुन्हे शाखेचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग अधिक तपास करत होते.
अखेर एक वर्षांनी तिचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ती देवनार मधील गौतम नगरमध्ये असल्याची माहिती मिळताच सोमवारी पोलिसांनी देवनार परिसरात झाडाझडती घेतली. यामध्ये मुलीचा शोध घेऊन मंगळवारी तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर फूस लावून तिला पळवून नेणाऱ्या रुपेश कंठे याला ताब्यात घेण्यात आले आहे.