पामबीच रोडवर खारफुटीला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 00:33 IST2018-12-07T00:33:00+5:302018-12-07T00:33:07+5:30
पामबीच रोडवर नेरूळजवळ सकाळी समाजकंटकांनी खारफुटीमधील गवताला आग लागली.

पामबीच रोडवर खारफुटीला आग
नवी मुंबई : पामबीच रोडवर नेरूळजवळ सकाळी समाजकंटकांनी खारफुटीमधील गवताला आग लागली. आगीमुळे खारफुटीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अग्निशमन दलाने वेळेत येऊन आग विझविल्यामुळे मोठे नुकसान टळले.
सारसोळे जेट्टीच्या पुढील बाजूला रोडवरून कोणीतरी गवताला आग लावून पळ काढला. गवत सुकले असल्यामुळे काही क्षणात खारफुटीमध्ये आग पसरू लागली. धुराचे लोळ दिसू लागल्यामुळे नेरूळ स्टेशनपासून पश्चिमेकडील वसहतीमधील नागरिकांनी पामबीच रोडकडे धाव घेतली. आगीमुळे खारफुटीचे वृक्षही जळत असल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते नीलेश दौंडकर यांनी अग्निशमन दलाला याविषयी माहिती दिली. गस्तीवरील पोलीसही घटनास्थळी पोहचले होते. अग्निशमन दलाच्या सीबीडी व नेरूळच्या दोन बंबांच्या साहाय्याने आग विझविण्यात आली.
>पामबीच रोडवर लागलेल्या आगीमध्ये खारफुटीचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाची वाहने वेळेत आल्याने आग नियंत्रणात आली. आग लावणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
- नीलेश दौंडकर,
सामाजिक कार्यकर्ते