शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नवी मुंबईत नायजेरियन तस्करांची राजधानी खलास; कोट्यवधींचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 07:19 IST

आतापर्यंत पोलिसांसह एनसीबीने ज्या ज्या कारवाया केल्या, त्यात नायजेरियन तस्करांचा सहभाग वारंवार उघडकीस आला आहे.

नवी मुंबई : आयटी पार्क आणि शैक्षणिक संस्थांच्या विस्तीर्ण जाळ्यामुळे नवी मुंबई शहर अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या तस्करांची राजधानी बनू पाहत आहे. यात मोठी संख्या नायजेरियन तस्करांची असल्याने नवी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी राबविलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनद्वारे पकडलेल्या ७५ नायजेरियन घुसखोरांच्या संख्येवरून सिद्ध झाले आहे. आतापर्यंत पोलिसांसह एनसीबीने ज्या ज्या कारवाया केल्या, त्यात नायजेरियन तस्करांचा सहभाग वारंवार उघडकीस आला आहे.

घुसखोरांकडून नवी मुंबईची निवड का? नवी मुंबई हे महामुंबई परिसरातील एक शांत आणि सुनियोजित शहर आहे. या शहरांत नवी मुंबईत शाळा, महाविद्यालये, मेडिकल कॉलेज, अभियांत्रिकी, नर्सिंग, महाविद्यालये यांचे मोठे जाळे आहे. याशिवाय येथील टीटीसी औद्योगिक वसाहतीत आयटी कंपन्यांची संख्या मोठी आहे. अलीकडे कॉल सेंटरची संख्या वाढू लागली आहे. यामुळे या शैक्षणिक संस्थांत शिकणारे, हॉस्टेलमध्ये राहणारे आणि आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याच वर्गाला हेरून अमली पदार्थांची तस्करी करणारे पेडलर आपले ग्राहक बनवतात. यामुळे त्यांची संख्या नवी मुंबईत वाढत आहे.

गावठाणांसह विस्तारित शहरांत स्वस्तात घरे

नवी मुंबईतील गावठाणे आणि विस्तारित शहरांत घरांचे भाडे तसे स्वस्त आहे. या भागात पोलिसांची गस्तही कमी असते. वर्दळही तशी कमी असते. हे तस्कर अशी गावठाणे, विस्तारित भागात भाड्याने घरे घेऊन राहतात. विदेशी नागरिक जास्त भाडे देतात, म्हणून घरमालक त्यांची माहिती पोलिसांना न देता, त्यांना भाडेकरू म्हणून ठेवून घेत असल्याचे तपासात अनेकदा उघड झाले आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी पकडलेल्या कारवायांमध्येही नायजेरियन नागरिक असलेल्या तस्करांचा समावेश आढळला आहे. विशेष म्हणजे यात महिलांची संख्याही मोठी आहे.

शुक्रवारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईनंतर नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. ३१ डिसेंबर २०२२ च्या मध्यरात्री सुरुवातीलाच नवी मुंबई पोलिसांनी खारघर येथील कारवाईत १० पुरुष आणि सहा महिलांना अटक करून एक कोटीहून अधिक किमतीचे चरस, गांजा, मेथ्थाक्युलॉनचा साठा जप्त केला होता. १५ रोजी पोलिसांनी एका नायजेरियनकडून अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. १ मे रोजी तळोजा-खारघरमधूनच ११ लाख ६० हजारांचा साठा जप्त करून एका नायजेरियनला ताब्यात घेतले होते. तो तुरुंगातून सुटून आलेला होता.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई