केरळचा आंबाही मुंबईत, मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 07:40 IST2023-11-08T07:40:27+5:302023-11-08T07:40:45+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूसच्या मुहूर्ताला महत्त्वाचे स्थान असते. जून, जुलैमध्ये काही आंब्याला मोहर येतो.

केरळचा आंबाही मुंबईत, मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण
नवी मुंबई : कोकणच्या हापूसनंतर केरळमधील आंब्याचीही मार्केटमध्ये आवक सुरू झाली आहे. केरळमधून आंबा विक्रीसाठी येत असून, चांगल्या दर्जाच्या मालाला प्रतिडझन तीन हजार रुपये भाव मिळत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूसच्या मुहूर्ताला महत्त्वाचे स्थान असते. जून, जुलैमध्ये काही आंब्याला मोहर येतो.
अवकाळी आलेला मोहर शेतकरी जपत असतात. हा आंबा नोव्हेंबरअखेरीस किंवा डिसेंबरमध्ये येतो. यावर्षी केरळमधील आंब्याचीही आवक सुरू झाली आहे. ४ डझन आंब्याची आवक होत असल्याची माहिती व्यापारी जावेद आलम यांनी दिली. दिवाळीलाच आंबा मार्केटमध्ये आल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.