कथ्थकचा ‘कलानंद’ सातासमुद्रापार
By Admin | Updated: January 4, 2016 01:52 IST2016-01-04T01:52:58+5:302016-01-04T01:52:58+5:30
बँकॉक येथे झालेल्या स्पर्धेत पल्लवीने १०मिनिटे देवीवंदना, चौताल, दुर्गास्तुती सादर केली तर आकांक्षाने १० मिनीटे गुरूवंदना, झपताल, सरगम, मिरा भजन आदी कथ्थक नृत्यातील प्रकार सादर केले.

कथ्थकचा ‘कलानंद’ सातासमुद्रापार
बँकॉक येथे झालेल्या स्पर्धेत पल्लवीने १०मिनिटे देवीवंदना, चौताल, दुर्गास्तुती सादर केली तर आकांक्षाने १० मिनीटे गुरूवंदना, झपताल, सरगम, मिरा भजन आदी कथ्थक नृत्यातील प्रकार सादर केले. ज्युनियर समुहाने क्रि ष्णाच्या चार लीला १३ मिनिटे सादर केल्या. कथ्थक विषारद होण्यासाठी सात परीक्षा पूर्ण करणे गरजेचे असते, असे भावना लेले यांनी सांगितले.
कथ्थक नृत्यकला ही भारताची परंपरा आहे. ठाण्यामध्ये या कलेची साधना करून विद्यार्थी घडवणाऱ्या कलानंद संस्थेने आंतराराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदके प्राप्त करून भारतीय कला प्रकारात आपला झेंडा सातासमुद्रापर नेला आहे.
कलानंद ही संस्था रौप्य महोत्सवाक डे वाटचाल करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या संस्थेने आपल्या भारतीय कथ्थक नृत्यकलेचा तुरा परदेशातही मानाने रोवला असून, ठाणे शहराला जागतिक मान मिळवून दिला आहे. ग्लोबल कौन्सील आॅफ आर्ट अँड कल्चरतर्फे कलानंद संस्थेच्या ज्युनियर चमुने सुवर्णपदक मिळवले आहे. पल्लवी लेले हिने सुवर्णपदक तर आकांक्षा सुब्बा ही कांस्यपदाकाची मानकारी ठरली आहे.
या स्पर्धेत कलानंद संस्थेच्या गुरू भावना लेले यांना या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या मंचावर आपली क ला सादर करण्याची संधी मिळाली. त्यासाठी ग्लोबल कौन्सील आॅफ आर्ट अँड कल्चर या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कलानंद संस्थेतील कलाकारांनी अखिल भारतीय सांस्कृतिक संघ या पुण्याच्या संस्थेकडे अर्ज केला होता, असे भावना लेले यांनी सांगितले. प्रथम पुणे येथे झालेल्या स्पर्धेतून पल्लवी, आकांक्षा आणि ज्युनियर चमुने विजेतेपद पटकाविले होते. नंतर संपूर्ण जगभरातून त्यांची स्पर्धा संपन्न झाली. प्रत्येक देशातून पहिला क्रमांक प्राप्त केलेल्या कलाकारांना बँकॉक येथे जाऊन आपले नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत जगभरातून ६०० कलाकारांनी २६ ते ३०डिसेंबर २०१५ रोजी कला सादर केली.
दोन वर्षापूर्वी दुबई येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये कलानंद या संस्थेतर्फे दोन सोलो आणि एक ज्युनियर समुहाने सादरीकरण केले होते. त्यावेळी त्यांनी सुवर्णपदक पटकाविले होते, असेही भावना लेले यांनी सांगितले. यावेळी सोलो सादरीकरणामध्ये ओडीसी नृत्य, भरतनाट्यम, कुचीपुडी आदी विविध भारतीय परंपरेनुसार नृत्य सादरीकरण झाले. हे सर्व नृत्य एकाच प्रकारात जज केले जाते. त्याला रेपेट्री असे संबोधले जाते. मात्र कलानंद संस्थेच्या पल्लवी लेले हिने यातही बाजी मारली.
भावना लेले यांनी नाशिक येथील गुरू संजिवनी कुलकर्णी यांच्याकडे कथ्थक विषारदाचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून नृत्यकलेमध्ये एम.ए. केले आहे. ठाणे शहरात त्याची संस्था कार्यरत असून, ५ वर्षांवरील १५० मुली त्यांच्याकडे शिकण्यास येतात. पल्लवीनेदेखील कथ्थक विषारद पूर्ण केले असून, अलंकारही पूर्ण झाल्याचे सांगितले. आंकाक्षाने नुकतीच ५ वी परीक्षा पूर्ण केली आहे.