कर्जत-पनवेल एसटीचा प्रवास धोकादायक
By Admin | Updated: March 23, 2017 01:35 IST2017-03-23T01:35:13+5:302017-03-23T01:35:13+5:30
कर्जत-पनवेल रस्त्यावर धावणाऱ्या एका एसटीच्या स्टार्टरला चार दिवसांपूर्वी आग लागली होती, ही आग विझवण्यासाठी गाडीत

कर्जत-पनवेल एसटीचा प्रवास धोकादायक
कर्जत : कर्जत-पनवेल रस्त्यावर धावणाऱ्या एका एसटीच्या स्टार्टरला चार दिवसांपूर्वी आग लागली होती, ही आग विझवण्यासाठी गाडीत अग्निरोधक यंत्रणा नव्हती. कोणताही मोठा प्रकार झाला नाही. मात्र, कर्जत-पनवेल एसटीचा प्रवास धोकादायक आहे. याबाबतचे निवेदन प्रवाशांसह भारतीय जनता पार्टीच्यावतीने एसटी आगारास देण्यात आले आहे. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.
१६ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता पनवेल स्थानकातून कर्जतला यायला एसटी सुटली. शेडुंग टोलनाका येथे या एसटीच्या स्टार्टरला आग लागली. एसटीत ५०-६० प्रवासी होते. प्रत्यक्षदर्शी आग विझवण्यास मदत करणारा विद्यालयीन विद्यार्थी अथर्व अनिल जोशी याने माहिती सांगितली. या घटनेची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा कल्पना दास्ताने, जिल्हा उपाध्यक्षा स्मिता घरलुटे, स्नेहा गोगटे, शर्वरी कांबळे, स्नेहा पिंगळे, लीना गांगल, प्रशांत उगले, विद्यार्थी अथर्व अनिल जोशी यांनी कार्यशाळा अधीक्षक भालचंद्र लाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात
आले.
पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांची संखा जास्त असून, पनवेलकडे धावणाऱ्या गाड्या सुस्थितीत नसतात.गाड्यांमध्ये अग्निरोधक यंत्रणा नाही, त्यांची माहिती कर्मचाऱ्यांना नाही, काही जागरूक नागरिक तक्रार करायला गेल्यावर कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात, तसेच तक्र ार नोंदण्यासाठी तक्र ार बुक मागितल्यावर तीही देत नाहीत, असे निवेदनात नमूद केले आहे तरी एसटीचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून गाड्या सुस्थितीत असाव्यात, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने मोठ्या गाड्या सोडाव्यात आणि गाडीमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवून त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यावे अशा मागण्या या दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.(वार्ताहर)