शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

कागद झाला, कपिल देव बनला 'कर्जत'कर; खरेदी केली एवढी मोठी जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:05 IST

कोठिंबे येथे खरेदी केली २५ एकर जमीन

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : १९९० च्या दशकात उदयास येऊ आलेली कर्जतमधील शेतघराची क्रेझ आजही कायम आहे. क्रिकेटपटू कपिल देव यांनाही कर्जतने भुरळ घातली असून त्यांनी कोठिंबे येथील २५ एकर जमीन त्यांनी खरेदी केली आहे. बुधवारी ते कर्जतमध्ये दस्त नोंदणीसाठी आले होते. 

प्रदूषणमुक्त वातावरण, निसर्ग संपन्नता, मुंबईपासून जवळ व खळखळ वाहणाऱ्या नद्यांमुळे कर्जत तालुक्याला सेकंड होम म्हणून पसंती दिली जात आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील कर्जत येथे फार्महाऊस असून त्या काळात काही महत्त्वाच्या बैठका या ठिकाणी होत असत. आता साहित्य, कला, क्रीडा, अर्थ, शिक्षण या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनीही कर्जतने भुरळ घातली आहे. 

क्रिकेटपट्टू कपिल देव यांनीही कर्जतच्या या निसर्गाने आकर्षित केले असून त्यांनी तालुक्यातील कोठिंबे भागात २५ एकर जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीचे दस्त कपिल देव यांच्याकडून नेरळ येथील सहनिबंधक कार्यालयात बुधवारी नोंदविण्यात आले. यावेळी येथील सन्मान हॉटेल परिसरात त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. दुपारी काळ्या रंगाची गाडी नेरळ येथे सहनिबंधक कार्यालयाबाहेर येऊन थांबली. गाडीत कोणीतरी अतिमहत्त्वाची व्यक्ती असावी असा अंदाज येणारे जाणारे व्यक्त करीत होते. दरम्यान, त्यांच्या दस्त नोंदणीचा नंबर आला आणि ते गाडीतून उतरताच चाहत्यांनी त्यांना गराडा घातला. पंधरा मिनिटांनी ते कसेबसे यातून बाहेर पडत दस्त नोंदणी कार्यालयात गेले. ते बाहेर येईपर्यंत चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.

सहनिबंधक कार्यलयात पोहोचल्यानंतर उपनिबंधक महेंद्र भगत यांनी त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. त्यावेळी त्यांचे वकील ॲड. भूपेश पेमारे, तसेच कार्यालयीन स्टाफ सुनील लगड, मंगेश तिठे, कुणाल दळवी, सारिका गायकवाड, विद्या जाधव यांनी सर्वांनी फोटो काढून घेतले. तर कार्यालयात उपस्थित अनेक वकिलांनाही कपिल देव यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. जेमतेम १५ मिनिटांत ते दस्त नोंदवून निघून गेले.

 

टॅग्स :Kapil Devकपिल देवNavi Mumbaiनवी मुंबईKarjatकर्जत