शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

कामोठेत हुक्का पार्लरचे लोण पसरतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:59 IST

कामोठे वसाहतीत हुक्का पार्लरचे लोण पसरले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी येऊन हुक्का ओढत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : कामोठे वसाहतीत हुक्का पार्लरचे लोण पसरले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी येऊन हुक्का ओढत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यामुळे तरुण पिढी बिघडत चालली असल्याचे कामोठेकरांचे म्हणणे आहे. याविरोधात नगरसेविका हेमलता गोवारी यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह, गृहराज्यमंत्री, पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन दाद मागितली आहे.गेल्या दोन वर्षांपासून खारघरमधील हुक्का पार्लरचे लोण कामोठे वसाहतीत पोहचले आहे. खारघरहून महाविद्यालयीन तरुण-तरुणी हुक्क्याचा धूर घेण्याकरिता या वसाहतीत येतात. सायंकाळी हे पार्लर हाऊसफुल्ल होत असल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांचे म्हणणे आहे. सेक्टर-३५ ब्लू हेवन इमारतीत हुक्का पार्लर सुरू आहे. विशेष म्हणजे हे पार्लर पोलीस ठाण्यापासून जवळ आहे. सेक्टर-६ ए थारवानी सोसायटीतही हुक्क्याचा धूर निघतोय. तसेच सेक्टर २0 आणि २१मध्ये हुक्का पार्लर सुरू आहेत. येथेही मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. संबंधित सोसायटीतील रहिवाशांनी या हुक्का पार्लरला विरोध दर्शवला आहे, परंतु त्याविरोधात ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. आणखी काही ठिकाणी हुक्क्याचे दुकान थाटण्याचे नियोजन सुरू आहे. तरुण पिढीला चुकीच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या या हुक्का पार्लरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेविका हेमलता रवी गोवारी या गेल्या सहा महिन्यांपासून महानगरपालिका, पोलीस, कामगार उपायुक्त यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, याकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गोवारी यांनी क्र ांतिदिनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन दाद मागितली आहे. त्या शिवाय अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही हुक्का पार्लरबाबत निवेदन दिले आहे. याशिवाय नवी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय कुमार, उपायुक्त अशोक दुधे यांच्याकडेही तक्रार केली आहे.>कॅफेच्या नावावर हुक्का पार्लरदुकाने निरीक्षकांकडून त्यांना जे परवाने देण्यात आले आहेत, त्यामध्ये चहा नास्ता इतकाच उल्लेख आहे. कॅफेच्या नावाखाली येथे हुक्क्याचा धूर काढला जात असताना संबंधितांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. प्रत्येक विभाग परस्परांकडे बोट दाखवित असल्याने कामोठे वसाहतीतील वातावरण खराब होत चालले आहे.>कामोठे शहरामध्ये जागोजागी हुक्का पार्लर सेंटर्स उघडण्यात आली आहेत. त्याकडे अल्पवयीन मुले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. हुक्का पार्लरच्या आडून अनेक गैरधंदे सुरू असल्याने त्याला कायदेशीर चाप बसविणे गरजेचे झाले आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांसह विविध विभागाला निवेदन दिले आहे.- हेमलता रवी गोवारी,नगरसेविका,पनवेल महानगरपालिका