कळंबोलीत भंगार गोदामाला भीषण आग

By Admin | Updated: April 16, 2016 00:48 IST2016-04-16T00:48:33+5:302016-04-16T00:48:33+5:30

मुंब्रा महामार्गालगत असलेल्या एका अनधिकृत भंगार गोदामाला शुक्र वारी दुपारी अचानक आग लागली. आगीची झळ बाजूला असलेल्या सूर्यविहार सोसायटीला बसली. यामध्ये एक दुचाकी

Kalamboli scrap godown is a fierce fire | कळंबोलीत भंगार गोदामाला भीषण आग

कळंबोलीत भंगार गोदामाला भीषण आग

कळंबोली : मुंब्रा महामार्गालगत असलेल्या एका अनधिकृत भंगार गोदामाला शुक्र वारी दुपारी अचानक आग लागली. आगीची झळ बाजूला असलेल्या सूर्यविहार सोसायटीला बसली. यामध्ये एक दुचाकी व स्विफ्ट कारला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. सिडको अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
कळंबोली कमलाकर जळे यांच्या मालकीची असलेली जागा भाडेतत्त्वावर शेरखान व जलील खान यांनी घेतली होती. याठिकाणी बेकायदा गोदाम थाटण्यात आले असून कागदी पुठ्ठा व नॉयलॉनच्या धाग्यांचा साठा करून ठेवला होता. या गोदामाला साडेबाराच्या सुमारास अचानकपणे आग लागली. आगीच्या झळांनी बाजूच्या सूर्यविहार हाऊसिंग सोसायटीतील घरांचेही नुकसान झाले. यात काही घरांतील खिडक्यांचे पडदे जळाले, तर अनेक फ्लॅटमधील खिडक्यांच्या काचांना तडा गेला. सांडपाणी वाहून नेणारे सोसायटीतील पाइपही जळाले. दोन दुचाकी व कारचे नुकसान झाले. (वार्ताहर)

Web Title: Kalamboli scrap godown is a fierce fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.