शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क १४०० किमीचा प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 17:39 IST

मेक इन इंडियाअंतर्गत देशांतर्गत उत्पादनाला विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. प्रत्यक्षात मात्र देशाच्या ग्रामीण भागात आजही पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

- वैभव गायकर

पनवेल: मेक इन इंडियाअंतर्गत देशांतर्गत उत्पादनाला विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. प्रत्यक्षात मात्र देशाच्या ग्रामीण भागात आजही पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना आजही अपेक्षित बाजारपेठ मिळत नाही. त्यामुळे या वस्तूंची विक्री करण्यासाठी या कारागिरांना पायपीट करावी लागते. पोटाची खळगी भरण्यासाठी आंध्रप्रदेशातील पाच  कुटुंबांनी तयार केलेल्या शोभेच्या वस्तू विकण्यासाठी सुमारे १४०० किमीचा प्रवास करून नवी मुंबई गाठली आहे. सध्या खारघरच्या रस्त्यावरच संसार थाटून वेतापासून विविध शोभेच्या वस्तू बनवून आपली उपजीविका करणाऱ्या या कुटुंबांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.         दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असलेले कंदील, फ्लॉवर पॉट, लॅम्प, टोपली , गुलदस्ता , आदी वस्तू दिवस-रात्र मेहनत करून हे कुटुंब बनवीत आहे. महागाई वाढल्याने कच्चा माल कमालीचा महागला आहे. आंध्र प्रदेशापेक्षा नवी मुंबई, मुंबई , ठाणे याठिकाणी अशा प्रकारे शोभेच्या वस्तूंची मागणी जास्त असल्याने आम्ही दरवर्षी याठिकाणी येत असतो, अशी प्रतिक्रिया हस्तकलाकार पी पालम्माय यांनी दिली. आंध्रप्रदेशामधील नेल्लुर जिल्ह्यातील आम्ही रहिवासी असून मूळ गावी आम्ही भूमिहीन असल्यामुळे हस्तकलेच्या व्यवसायावर आम्ही आमची उपजीविका भागवीत असतो. दोन तीन कुटुंबे एकत्र येऊन आम्ही रस्त्यावरच आमचा व्यवसाय थाटत असतो. याच ठिकाणी जेवण, काही क्षण विश्रांती घेऊन आमची दिनचर्या पुढे ढकलत असतो. वेत व फायबर वायरच्या जोडीने या वस्तू तयार केल्या जातात.           २५० रुपयांपासून ते ११०० रुपयांपर्यंत शोभेच्या वस्तू याठिकाणी विक्रीसाठी ठेवल्या जातात. या वस्तू टिकावू असल्याने ग्राहक देखील अशाप्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पसंत करतो. मात्र चायना मेडमुळे अनेक ग्राहक या वस्तू खरेदीकडे दुर्लक्ष करतो. सध्या चायनामेडला अनेक ठिकाणी विरोध दर्शविला जातो त्या अनुषंगाने भारतीय बनावटीच्या या हस्तकलेच्या वस्तू खरेदी करणे उत्तमच असल्याचे या वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहक दीपक शिंदे  यांनी सांगितले. या हस्तकलेच्या लहान वस्तू बनविण्यासाठी सुमारे ६ ते ७ तासांचा कालावधी लागतो तर मोठ्या आकाराची वस्तू बनविण्यासाठी कमीत कमी १५ ते १८ तास लागत असल्याचे के. यंकटेश या हस्तकलाकाराने सांगितले. महिला देखील आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी या व्यवसायात काम करतात. चाळीस वर्षीय मुत्यालमाँ यांनी सांगितले की, आम्ही सध्या राहत असलेल्या जागी वीज, पाणी कसलीच व्यवस्था नाही तरी देखील आम्हाला जीवनाचा गाडा हाकावाच लागणार असल्याने एक महिना याठिकाणी थांबल्यानंतर पुढील वर्षभर कमाविलेल्या पैशावर आम्हाला उपजीविका भागवावी लागणार आहे. खारघरमधील सेक्टर १३ जवळील अग्निशमन दलाच्या इमारतीसमोर या हस्तकलाकारांनी आपला संसार थाटला आहे. याच ठिकाणी या हस्तकलेने बनविलेल्या वस्तू विक्री देखील केल्या जातात. नवी मुंबईसह, अहमदाबाद, पुणे, मुंबई यासारख्या मेट्रोपोलिटन शहरातील एका कोपऱ्यात आपला व्यवसाय हे हस्तकलाकार थाटत असतात.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई