शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

जेएनपीटीने केली महाकाय कार्गोची हाताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 1:05 AM

पोर्ट अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जेएनपीटीने उपकरणे शॅलो वॉटर बर्थवर उभ्या असलेल्या मालवाहतूक जहाज एम.व्ही.हॅपी स्कायवर ३६ तासात यशस्वीरीत्या लोड केली.

उरण : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने निर्यातीसाठी आलेल्या महाकाय प्रोजेक्ट कार्गोची यशस्वीरीत्या हाताळणी केली. ही अवजड यंत्रसामुग्री आफ्रिकेतील जीनिया या देशातील खाण विकास आणि निर्यात सुविधांसाठी बार्ज लोडिंग मशिनची सब-असेंब्ली होती. पोर्ट अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जेएनपीटीने ही उपकरणे शॅलो वॉटर बर्थवर उभ्या असलेल्या मालवाहतूक जहाज एम.व्ही.हॅपी स्कायवर ३६ तासात यशस्वीरीत्या लोड केली.१,११५ मेट्रिक टन माल व १३२ पॅकेजेस असलेल्या या अवजड कार्गो (मुख्य बूम-शटल बूम असेंब्ली)ची लांबी ६२ मीटर्स व वजन ३८४ टन होते. या संपूर्ण प्रयोगाद्वारे मेक इन इंडियासाठी जेएनपीटीचे योगदान दिसून आले. या प्रसंगी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, अशा महाकाय अवजड कार्गोच्या यशस्वी लोडिंगसाठी उच्च दर्जाचे कौशल्य आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक असते, जे आमच्या पोर्ट अधिकाºयांनी दाखवून दिले. अशा कठीण प्रसंगात बंदराची कार्यक्षमता व सर्व विभागांची एकजूट पूर्णपणे दिसून येते. कारण अगदी लहान त्रुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. मला माझ्या टीमचा अभिमान असून, अशा प्रकारच्या कामगिरीने जेएनपीटी देशातील सर्वोत्तम कंटेनर पोर्ट तसेच जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पोर्ट पैकी एक असल्याचे सिद्ध होते. ही माल हाताळणी मेसर्स शापुरजी पालोनजी कंपनी प्राइव्हेट लिमिटेडच्या आंतरराष्ट्रीय ईपीसी कॉन्ट्रॅक्टचा भाग होती व जे. एम. बक्षी हे जहाजाचे एजंट होते.

टॅग्स :JNPTजेएनपीटीNavi Mumbaiनवी मुंबई