ठाणो मनपा मुख्यालयात दूषित पाणीपुरवठा

By Admin | Updated: September 19, 2014 23:10 IST2014-09-19T23:10:26+5:302014-09-19T23:10:26+5:30

ठाणो महापालिका मुख्यालयात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी येत असल्याने अखेर महिला कर्मचा:यांनी ही बाब आता महापालिकेच्या वरिष्ठ अधिका:यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

Irregular water supply at Thane Municipal Corporation | ठाणो मनपा मुख्यालयात दूषित पाणीपुरवठा

ठाणो मनपा मुख्यालयात दूषित पाणीपुरवठा

ठाणो : ठाणो महापालिका मुख्यालयात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी येत असल्याने अखेर महिला कर्मचा:यांनी ही बाब आता महापालिकेच्या वरिष्ठ अधिका:यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानंतर, मुख्यालयातील अंतर्गत वाहिनीची तपासणी पाणीपुरवठा विभागाने सुरू केली आहे.
ठाणो शहरातील काही भागांना आजही महापालिकेच्या दूषित पाणीपुरवठय़ाचा सामना करावा लागत आहे. परंतु, आता महापालिका मुख्यालयातही दूषित पाणीपुरवठा होऊ लागल्याने पालिकेतील कर्मचा:यांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 
गेल्या काही दिवसांपासून मुख्यालयात असलेल्या नळांद्वारे दूषित पाणीपुरवठा सुरू असून यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली होती. परंतु, याची दखल न घेतली गेल्याने अखेर शुक्रवारी मुख्यालयातील महिला कर्मचा:यांनी याचा जाब उपायुक्त संदीप 
माळवी यांना विचारला. 
त्यानंतर, मुख्यालयातील अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेत समस्या निर्माण झाल्याने हा प्रकार घडला असावा, असे  स्पष्ट करून संबंधित विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आह़े

 

Web Title: Irregular water supply at Thane Municipal Corporation