शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

‘नैना’मध्ये ६५८२ कोटींची गुंतवणूक, टीपीएस-२ मुळे विकासाला चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 02:20 IST

सिडकोच्या प्रस्तावित ‘नैना’ प्रकल्पाच्या दुसऱ्या नगर रचना परियोजनेस (टीपीएस-२) मंजुरी दिल्यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे.

नवी मुंबई  - सिडकोच्या प्रस्तावित ‘नैना’ प्रकल्पाच्या दुसऱ्या नगर रचना परियोजनेस (टीपीएस-२) मंजुरी दिल्यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. दुस-या योजनेमध्ये तब्बल ६५८२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. दोन योजना सुरू झाल्या असून, तिसरी नगररचना विभागाकडे सादर केली असून तिन्ही योजनांमध्ये तब्बल ६४८ हेक्टर जमीन विकासासाठी उपलब्ध होणार आहे.मुंबईमधील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी शासनाने नवी मुंबईची उभारणी केली; परंतु या परिसरामधील जमीनही संपुष्टात येऊ लागली आहे. यामुळे शासनाने नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रामध्ये नवीन शहरे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेन व ठाणे तालुक्यामधील २७० गावांच्या परिसरामध्ये तब्बल २३ स्मार्ट सिटीज उभारण्यात येणार आहेत. शासनाने ‘नैना’ची घोषणा केली; परंतु या परिसरासाठी नगर रचना परियोजना तयार झाल्या नसल्यामुळे विकासाला अपेक्षित गती मिळाली नाही. जुलै २०१४ पासून या परिसरामधील बांधकामांना परवानगी देण्यास सुरुवात झाली; परंतु परवानगी देण्यास खूप विलंब होऊ लागला होता. आतापर्यंत १२५ प्रकल्पांनाच बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. यापैकी १६ प्रकल्पांना बांधकाम पूर्ण झाल्याची परवानगी दिली आहे. विकास आराखड्याचे काम सिडकोने सुरू केले होते. २७ एप्रिल २०१७ रोजी अंतरिम विकास आराखड्यास शासनाने परवानगी दिली. ३७ चौरस किलो मीटर क्षेत्रामधील २३ गावांसाठी ही योजना होती.स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगररचना परियोजनांद्वारे शहरांचा विकास साधण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अग्रणी आहे. मुंबई हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. म्हणून या प्रकल्पास गती देण्यासाठी सिडकोने नगररचना परियोजनांद्वारे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला व प्रारूप नगर विकास परियोजनांमध्ये बदल करत सिडकोच्या वतीने तीन दशकांनंतर ६४८ हेक्टर क्षेत्रासाठी तीन नगररचना परियोजना तयार करण्यात आल्या. पहिली टीपीएस योजना आॅगस्ट २०१७ मध्ये कार्यान्वित केली. दुसरी योजनाही कार्यान्वित केली आहे. यामध्ये देवद, भोकरपाडा, चिपळे, विहिघर, बेलवली, सांगडे गावामधील १९४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. भूखंड एकत्रीकरणावर या योजनेचे यश व अपयश अवलंबून असणार आहे. या योजनेमधील लाभधारकांना मूळ भूखंडाच्या ४० टक्के भूखंड हा अंतिम भूखंड म्हणून परत मिळणार आहे. त्यासाठी अडीच चटईक्षेत्र असणार आहे. उर्वरित ६० टक्के जमिनी पायाभूत सुविधांकरिता वापरण्यात येणार आहे. या परिसरामध्ये सार्वजनिक सुविधांसाठी ५८२ कोटींची गुंतवणूक होणार असून खासगी क्षेत्रामधून तब्बल सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूूक केली जाणार आहे.टीपीएस-२ मधील गावेउरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण व ठाणे तालुक्यांमधील २७० गावांचा ‘नैना’मध्ये अंतर्भाव आहे. यामधील २३ गावांचा पहिल्या योजनेमध्ये सहभाग करण्यात आला आहे. सिडकोने टीपीएस दोन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये पनवेलमधील देवद, भोकरपाडा, चिपळे, विहिघर, बेलवली, सांगडे या गावांचा समावेश असणार असून, यामधील १९४ हेक्टर क्षेत्रफळाचा समावेश असणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई