अभिनेत्री श्रुती मराठेची दिलखुलास मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:15 IST2019-05-01T00:14:49+5:302019-05-01T00:15:05+5:30

ओरिअन मॉलचा वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम : महिलांची उपस्थिती लक्षणीय; स्पर्धेत सेल्फी काढण्याची संधी

Interview with actress Shruti Marathe Dilkhulas | अभिनेत्री श्रुती मराठेची दिलखुलास मुलाखत

अभिनेत्री श्रुती मराठेची दिलखुलास मुलाखत

पनवेल : सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात मॉल संस्कृतीने आपले स्थान पक्के केले आहे. पनवेलचा झपाट्याने विकास होत असून, या ऐतिहासिक शहरात मॉलची नितांत आवश्यकता आहे आणि पनवेलकरांना ही संधी परुळेकर कुटुंबाने दिल्याचे प्रतिपादन अभिनेत्री श्रुती मराठे यांनी केले.

ओरिअन मॉलच्या तृतीय वर्धापनदिनामित्त मराठे, कुणाल रेगे यांची खास मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीत त्यांना आवडीनिवडी, सिनेक्षेत्राकडे वळण्याच्या कारणाबरोबरच मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनयाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या वेळी मराठे यांनी पनवेलमधील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्पर्धेमुळे अनेकांना श्रुती मराठे यांच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी मिळाली. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्र माला मानसी परुळेकर, मनांकी परुळेकर, दिलीप करेलिया आणि मनन परु ळेकर आदी कु टुंबीय उपस्थित होते.

Web Title: Interview with actress Shruti Marathe Dilkhulas