शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आंतरराज्यीय बस टर्मिनल कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 01:53 IST

खांदेश्वरमध्ये भूखंड आरक्षित : सिडकोची उदासीनता, पाच वर्षांपासून प्रकल्प रखडला

नवी मुंबई : सिडकोने आंतरराज्यीय बस टर्मिनलसाठी खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ पाच हेक्टरची जागा आरक्षित केली आहे. या प्रकल्पासाठी २०० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. सिडकोच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २०१४ मध्ये जाहीर करण्यात आला होता; परंतु सिडकोच्या उदासीन धोरणामुळे मागील पाच वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यापलीकडे या संदर्भात कोणतीही कार्यवाही न झाल्याने शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प कागदावरच सीमित राहिला आहे.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार नवी मुंबईची लोकसंख्या १७ लाख इतकी आहे; परंतु पायाभूत सुविधा विकसित करताना सिडकोने २०३१ पर्यंतच्या लोकसंख्येचा आधार घेतला आहे. त्यानुसार २०१३ मध्ये शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या घरात जाईल, असा ढोबळ अंदाज वर्तविला जात आहे. तसेच पुढील २० वर्षांत जवळपास १४ लाख रोजगारनिर्मिती होईल, असा सिडकोचा अंदाज आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील काळात रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण पडणार आहे. अशा परिस्थितीत परराज्यातून येणाऱ्या परिवहन सेवेच्या बसेसचे आतापासूनच सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने सिडकोने आंतरराज्यीय बस टर्मिनलचा प्रकल्प प्रस्तावित केला होता. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप अर्थात पीपीटी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पात टर्मिनलची भव्य इमारत, कॅन्टीनची सुविधा, बसेससाठी क्यू आकाराचे शेल्टर्स, पार्किंग तसेच टॅक्सी आणि रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा आदी सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या बस टर्मिनलमध्ये सुमारे ३०० बसेस पार्क करण्याची सुविधा असणार आहेत.विशेष म्हणजे, सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी २०१४ मध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या प्रकल्पाची घोषणा केली होती.

महापालिकेचा रबाळेत पायलट प्रोजेक्टशहरात राहणाऱ्या विविध प्रांत व राज्यातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने परराज्यातील परिवहनच्या बसेससाठी अधिकृत थांबा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रबाळे येथे ही सुविधा सुरू निर्माण करण्याचे सूतोवाच महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी काही महिन्यांपूर्वी सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाशी बोलताना केले होते.

विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे नवी मुंबईची जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, अंतर्गत रस्त्यांचे जाळे, दळणवळणाच्या सुसज्ज सुविधा, रोजगारनिर्मिती आदीमुळे विविध राज्यांतील लोक नवी मुंबईकडे आकर्षित होऊ लागले आहेत, त्यामुळे मागील दहा वर्षांत परराज्यातून शहरात येणाºया परिवहन उपक्रमांच्या बसेसच्या फेऱ्या वाढल्या आहेत.

या बसेसना अधिकृत थांबे नसल्याने सायन-पनवेल महामार्गावरील वाशी, सानपाडा, सीबीडी आणि कळंबोली आदी ठिकाणांहून प्रवासी घेतात. शहरात येणाऱ्या या प्रवाशांच्या दृष्टीने हे असुरक्षित व गैरसोयीचे असल्याने परराज्यातून येणाºया शासकीय उपक्रमांच्या बसेसना एक अत्याधुनिक दर्जाचे बस टर्मिनल निर्माण करावे, अशी रहिवाशांची मागणी आहे. त्यानुसार रबाळे उड्डाणपुलाखाली सध्या प्रायोगिक तत्त्वावर आंतरराज्यीय बस टर्मिनल सुरू करण्याची महापालिकेची योजना आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबईInternationalआंतरराष्ट्रीय