‘आयएनआयएफडी’चा फॅशन शो रंगला!

By Admin | Updated: July 31, 2015 00:09 IST2015-07-31T00:09:57+5:302015-07-31T00:09:57+5:30

आयएनआयएफडी आणि ए. आर. क्रिएशन या फॅशन आणि इंटेरिअर डिझाइनमधील संस्थांच्या वतीने वाशीतील सिडको सभागृहात फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते

INFID's fashion show colors! | ‘आयएनआयएफडी’चा फॅशन शो रंगला!

‘आयएनआयएफडी’चा फॅशन शो रंगला!

नवी मुंबई : आयएनआयएफडी आणि ए. आर. क्रिएशन या फॅशन आणि इंटेरिअर डिझाइनमधील संस्थांच्या वतीने वाशीतील सिडको सभागृहात फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये अनेक सिनेकलावंत सहभागी झाले.
आयएनआयएफडीचे वार्षिक इंटेरिअर प्रदर्शन सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी इंटेरिअर डिझाइनची अनेक मॉडेल्स व फॅशन गार्मेंटसही सादर केली. फॅशन शोमध्ये अनेक मान्यवरांनी भाग घेतला होता. संस्थेचे संचालक अशोक दर्यानी यावेळी म्हणाले की, ‘मला माझ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचा खूप अभिमान आहे. या फॅशन शोचे श्रेय आयएनआयएफडीच्या वाशीतील टीम व विद्यार्थ्यांचे आहे. आम्ही प्रत्येक वर्षी नवी मुंबईला अशाप्रकारे उत्तम शो देण्याचा प्रयत्न करत राहू.’
ए. आर. क्रिएशनचे संचालक पंडित राठोड यांनी सांगितले की, ‘यंदा २५० विद्यार्थ्यांनी इंटेरिअर आणि फॅशन क्षेत्रात प्रशिक्षण घेतले. हा शो त्यांनी वर्षभर शिकलेल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी होती.’ कार्यक्रमास अभिनेते विजय पाटकर, किशोरी शहाणे व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: INFID's fashion show colors!