नेरूळच्या एमजीएम कॉलेजमधील शौचलयात आढळलं अर्भक
By Admin | Updated: December 27, 2016 12:49 IST2016-12-27T12:49:14+5:302016-12-27T12:49:14+5:30
नेरूळच्या एमजीएम कॉलेजमधील शौचलयात अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे अर्भक तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

नेरूळच्या एमजीएम कॉलेजमधील शौचलयात आढळलं अर्भक
>ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 27 - अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी वादात सापडलेले नेरूळचे एमजीएम कॉलेज नव्या वादत अडकले आहे. कॉलेजच्या शौचालयात अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे अर्भक तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. नेरुळ पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. कॉलेज व शाळेसाठी वापराकरिता असलेल्या महिला शौचालयात शनिवारी सकाळी हे अर्भक आढळून आले.
सफाई कामगार शौचालयाची साफसफाई करत असताना त्यांना हे अर्भक आढळलं. त्यांनी तात्काळ ही बाब शाळेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शाळेने पोलिसांना याची माहिती दिली. अर्भक ताब्यात घेण्यात आलं असून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली आहे. हे शौचालय शाळा व कॉलेजच्या विद्यार्थिनी तसेच महिला शिक्षिकांच्या वापरासाठी असून, त्यांच्यापैकी कोणीतरी हे अर्भक टाकलं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.